
Hardik Pandya: न्यूझीलंड कॅप्टनचा रडीचा डाव; हार्दिकची विकेट वादाच्या भोवऱ्यात!
Hardik Pandya Wicket Controversy : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा इनफॉर्म दिग्गज फलंदाज हार्दिक पांड्या 38 चेंडूत 28 धावा करून तो क्लीन बोल्ड झाला. ज्या चेंडूवर पांड्या आऊट झाला, त्यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा: Shubman Gill: लंकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध ही गिलचा तांडव! ठोकले सलग दुसरे शतक अन् रचला इतिहास
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारताने चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेत हार्दिक पांड्याला उपकर्णधार आहे. हार्दिक पांड्याला 40व्या षटकातील चौथ्या चेंडूवर डॅरेल मिशेलने बाद केले. 38 चेंडूत 28 धावा करून तो क्लीन बोल्ड झाला. यष्टिरक्षक लॅथमच्या चुकीमुळे बेल्स पडल्याचे दिसून आले, परंतु तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले. या निर्णयामुळे समालोचक मोहम्मद कैफ आणि संजय बांगर आश्चर्यचकित झाले.
टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे लक्ष्य दिले आहे. सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने शानदार द्विशतक झळकावले. त्याने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 208 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाने फलंदाजी केली नाही. रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादवने 31 आणि हार्दिक पांड्याने 28 धावा केल्या.