Shubman Gill: लंकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध ही गिलचा तांडव! ठोकले सलग दुसरे शतक अन् रचला इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill

Shubman Gill: लंकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध ही गिलचा तांडव! ठोकले सलग दुसरे शतक अन् रचला इतिहास

Ind vs Nz Shubman Gill Century And Create History : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने धमाकेदार फॉर्म कायम ठेवत आणखी एक उत्कृष्ट खेळी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर आता त्याने न्यूझीलंडविरुद्धही अशीच सुरुवात केली आहे. गिलने सलग दुसऱ्या वनडेत शतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. गेल्या 11 डावात 3 शतके झळकावली आहेत.

हेही वाचा: IND vs NZ: 'टीम इंडियातून वगळले आहे तर चहलने आता निवृत्ती घ्यावी'

न्यूझीलंड विरुद्धच्या भारताच्या वन-डे सामन्यात शुभमन गिल हा सर्वात जलद 1000 एकदिवसीय धावा करणारा भारतीय ठरला. गिलने 19व्या डावात 1000 धावांपर्यंत मजल मारली आहे. गिलने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकून हा पराक्रम केला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम खेळी खेळताना शुभमन गिलने केवळ 52 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. यानंतर त्याने आपल्या डावाला गती देताना मोठे चौकार मारत सलग दुसरे शतक झळकावले. 87 चेंडू खेळल्यानंतर गिलने 14 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा: Rishabh Pant Update: हॉस्पिटल मधून पंतला मिळणार डिस्चार्ज? लवकरच मैदानात...

शुभमन गिलने कामागून एक सलग दोन शतके झळकावली आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये विराट कोहलीसोबत फलंदाजी करताना शतक झळकावले होते आणि येथे त्याने एकट्यानेच शतक झळकावले होते. त्याने गेल्या वर्षी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि त्यानंतर 10 व्या डावात आणखी दोन शतके झळकावली.