India vs NewZealand 1st Test अब तक थ्री नॉट थ्री! गावसकरांकडून अय्यरला मिळाली टेस्ट कॅप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas Iyer
अब तक थ्री नॉट थ्री! गावसकरांकडून अय्यरला मिळाली टेस्ट कॅप

अब तक थ्री नॉट थ्री! गावसकरांकडून अय्यरला मिळाली टेस्ट कॅप

India vs New Zealand, 1st Test At Green Park, Kanpur : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण करत आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Test Series) यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवण्यात येत आहे. अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकल्यानंतर प्लेइंग-11 जाहीर केली. यात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी अय्यरला टेस्ट कॅप दिली. कसोटीमध्ये पदार्पण करणारा अय्यर टीम इंडियाचा 303 वा खेळाडू ठरलाय. याशिवाय यंदाच्या वर्षी कसोटी पदार्पण करणारा तो पाचवा खेळाडू आहे.

सुनील गावसकर यांचे कानपूरमधील रेकॉर्ड कमालीचे आहे. त्यांच्या हस्तेच अय्यरनं टेस्ट कॅप स्विकारली. गावसकरांनी या मैदानात एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी 9 कसोटी सामन्यातील 14 डावात 45 च्या सरासरीने 629 धावा केल्या आहेत. 176 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. कानपुरमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ते दुसऱ्या स्थानावर आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांनी या मैदानात 700 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Cricket | टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक म्हणून संघाचा पाठींबा

गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांनी कानपुर कसोटीत 700 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यांनी 7 कसोटीतील 12 डावात 86 च्या सरासरीने 776 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 179 ही त्यांची या मैदातील सर्वोच्च खेळी आहे. गावसकर आणि विश्वनाथ यांच्याशिवाय या मैदानात कोणत्याही अन्य फलंदाजांना 600 पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत.

हेही वाचा: IND vs NZ 1st Test : अजिंक्यनं टॉस जिंकला, अय्यरला पदार्पणाची संधी

वर्ल्ड टेस्ट चँम्पियशिप (World Test Championship) मधील भारतीय संघाची ही दुसरी मालिका आहे. टीम इंडियाने (Team India) इंग्लंडमध्ये झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. कोरोनामुळे पाचवा कसोटी सामना स्थगित झाला होता. हा सामना पुढच्या वर्षी रंगणार आहे.

loading image
go to top