Cricket | टीम पेनला ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक म्हणून संघाचा पाठींबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tim paine

Cricket | टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक म्हणून संघाचा पाठींबा

sakal_logo
By
किरण महानवर

मेलबर्न : टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला मोठा धक्का बसला आहे. पण ऍशेस मालिकेमध्ये यष्टिरक्षक म्हणून काम सुरू ठेवण्यासाठी त्याचे सहकारी त्याच्या मागे उभे राहिले असल्याचं ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मार्कस हॅरिसने म्हटले आहे.

एका तरुणीला अश्लिल संदेश पाठवल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर टीम पेनने कर्णधार पदाचा राजीनामा दिला. पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. कमिन्सशिवाय माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही या शर्यतीत आहे. टीम पेन 2018 पासून ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार होता. त्याच्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

हेही वाचा: IND VS NZ | न्यूझीलंडसाठीही फिरकीचे जाळे असणार?

"पेनच्या या निर्णयामुळे लोकांना साहजिकच थोडा धक्का बसला आहे. पण ऑस्ट्रेलिया संघामध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू आहे. कोणीतरी पुढचं पाऊल उचलून ऑस्ट्रेलिया संघाला समोरून नेतृत्व करावे लागेल. खेळाडूंना पेनच्या या निर्णयाची माहिती त्याचे अधिकृत वक्तव्य जाहीर होण्याच्या अर्धा तास आधीच झाली होती, असेही मार्क्स हॅरिसने म्हटले आहे.

क्रिकेट तस्मानियाकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वागणुकीवर 2018 मध्ये आरोप करण्यात आला होता. तेव्हा पण टीम पेनला त्याच्या चुकीच्या कृत्यांबाबत माफ करण्यात आले होते. पेनला 8 डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्धच्या ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

loading image
go to top