IND vs NZ: पाठदुखी काही पाठ सोडेना! सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricket Team Overhaul – India Squad SL Series

IND vs NZ: पाठदुखी काही पाठ सोडेना! सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का

Shreyas Iyer Ruled Out Ind vs Nz: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून एकदिवसीय मालिका खेळल्या जाणार आहे. याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विट करून अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: IND vs NZ: भविष्य अंधारातच! कोहली-रोहित बाबत गावसकरांचे मोठे वक्तव्य

18 जानेवारीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना रायपूरमध्ये 21 जानेवारीला होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळल्या जाणार आहे.

श्रेयस अय्यरसाठी गेल्या वर्ष म्हणजे 2022 मध्ये भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 17 सामन्यात 724 धावा केल्या. पण या नवीन वर्षाची 2023 ची सुरुवात त्याच्यासाठी चांगली राहिलेली नाही. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये 28, 28 आणि 38 धावा केल्या. 2022 च्या अखेरीस श्रेयस अय्यरने दोन कसोटी सामने खेळले.

हेही वाचा: Babar Azam: Sexting च्या आरोपानंतर बाबरचे ट्विट व्हायरल; म्हणाला...

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.