IND vs NZ: 'टीम इंडियातून वगळले आहे तर चहलने आता निवृत्ती घ्यावी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yuzvendra chahal

IND vs NZ: 'टीम इंडियातून वगळले आहे तर चहलने आता निवृत्ती घ्यावी'

India vs New Zealand ODI: वर्ष बदलले त्यासोबतच भारतीय क्रिकेटमध्ये बरेच काही बदलले. टी-20 कर्णधार बदलला. विराट कोहली-रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमधून बाहेर झाले. भारतीय फिरकी गोलंदाजीतही बदल स्पष्टपणे दिसत आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा वनडे किंवा टी-20 मध्ये पहिला पसंतीचा फिरकी गोलंदाज होता, आता त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. कारण तो न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर आहे.

हेही वाचा: IND vs NZ: रोहितने नाही दिली संधी! 'या' खेळाडूची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच एंडिंगला

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत चहलला का संधी देण्यात आली नाही? याबाबत कर्णधार रोहितने काहीही सांगितले नाही किंवा बीसीसीआयकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. टीम इंडियातून वगळले आहे तर चहलने आता निवृत्ती घ्यावी, कुलदीपने टीम इंडियात पुनरागमन केले आहे. असा एका चाहत्यांनी सल्ला दिला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात चहल खेळला. यानंतर पुढील दोन सामन्यांत कुलदीप यादव त्याच्या जागी खेळला. चहलच्या अनुपस्थितीचे कारण खांद्याची दुखापत असल्याचे सांगण्यात आले. कुलदीपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या 2 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट घेतले.

हेही वाचा: Ishan Kishan IND vs NZ: दुहेरी शतकवीर किशनला मिळाली संधी!

चहल गेल्या काही सामन्यांपासून बेरंग दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 1 विकेट घेण्यासाठी त्याने 58 धावा खर्च केल्या. तर कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या 2 एकदिवसीय सामन्यात 67 धावांत एकूण 5 विकेट घेतल्या. म्हणजेच विकेट घेण्याच्या बाबतीत कुलदीपने त्याचा जुना साथीदार चहलला मागे टाकले.

हेही वाचा: Rishabh Pant Update: हॉस्पिटल मधून पंतला मिळणार डिस्चार्ज? लवकरच मैदानात...

कुलदीपने 75 एकदिवसीय सामन्यांमध्ये 124 विकेट्स घेतल्या आहेत, तर चहलच्या नावावर 71 एकदिवसीय सामन्यांमध्ये 119 विकेट आहेत. कुलदीपने भारतात खेळल्या गेलेल्या 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31 च्या सरासरीने 49 विकेट घेतल्या आहेत. तर चहलने घरच्या मैदानावर केवळ 17 एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या नावावर 28 विकेट आहेत. कुलदीपने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील जवळपास निम्म्या विकेट्स फक्त भारतात घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत कुलदीप घरच्या स्थितीत अधिक प्रभावी दिसत आहे.