IND vs NZ: छोट्या चहलची मोठी करामत! रचला इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs nz-yuzvendra chahal-record-

IND vs NZ: छोट्या चहलची मोठी करामत! रचला इतिहास

Ind vs Nz Yuzvendra Chahal Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना लखनौ येथे खेळल्या गेला. या सामन्यात युझवेंद्र चहलचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. त्याने एक विकेट घेत इतिहास रचला. चहल हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक 91 विकेट घेतल्या आहेत. त्याने या प्रकरणात भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे.

लखनऊमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी युझवेंद्र चहलच्या नावावर 90 विकेट होत्या, पण दुसऱ्या T20 मध्ये एक विकेट घेत चहलने हा खास विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात त्याने 2 षटकात केवळ 4 धावा देत 1 बळी घेतला. यादरम्यान त्याने मेडन ओव्हरही टाकला. चहलने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

  • युझवेंद्र चहल - 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 74 डाव - 91 विकेट.

  • भुवनेश्वर कुमार - 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 86 डाव - 90 विकेट.

  • आर अश्विन - 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 65 डाव - 72 विकेट.

  • जसप्रीत बुमराह - 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 59 डाव - 70 विकेट.

  • हार्दिक पांड्या - 86 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने, 75 डाव - 65 विकेट.

युझवेंद्र चहलने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 72 एकदिवसीय आणि 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 27.13 च्या सरासरीने एकूण 121 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना चहलने 24.68 च्या सरासरीने आणि 8.14 च्या इकॉनॉमीने 91 विकेट्स घेतल्या.