Ind vs Pak Babar Azam : बाबर आझम बाद झाल्यानंतर झाला ट्रोल, लोकांनी कोहलीच्या ट्विटची करून दिली आठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Pak Asia Cup 2022 Babar Azam

Ind vs Pak: बाबर आझम बाद झाल्यानंतर झाला ट्रोल, लोकांनी कोहलीच्या ट्विटची करून दिली आठवण

Ind vs Pak Asia Cup 2022 Babar Azam : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानी चाहत्यांना स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र बाबर आझम भारताविरुद्ध फ्लॉप ठरला. आझमला फक्त 10 धावा करता आल्या आणि डावाच्या तिसऱ्या षटकात बाद झाला.

हेही वाचा: Asia Cup : पंतच्या जागी दिनेश कार्तिकला का मिळाली संधी, जाणून घ्या 5 कारणे

भारताविरुद्धच्या अपयशामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल केल्या जात आहे. चाहत्यांनी त्याला त्याच्या एका ट्विटची आठवण करून दिली, जे त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी केले होते. विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत असताना बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. लिहिले होते की, ही वाईट वेळही निघून जाईल, तुम्ही मजबूत राहा. आता चाहत्यांनी बाबरला त्याच ट्विटची आठवण करून दिली आणि तुम्हीही मजबूत राहा असे म्हटले आहे.

हेही वाचा: IND vs PAK : भारताच्या NIT श्रीनगरमध्ये भारत-पाकिस्तान सामना समुहाने पाहण्यास बंदी

बाबर आझमचा ड्रेसिंग रुममध्ये बसलेला फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खूपच हैराण आणि दुःखी दिसत आहे. लोकांनी मजा केली आणि लिहिले की या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासात बरेच काही घडले आहे, ऋषभ पंत संघाबाहेर आहे, रिव्ह्यू देखील घेतले जात आहेत आणि आता बाबर आझम बाहेर आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर झमान, इफ्तिकार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारीस रौफ, शहानवाज दहानी

Web Title: Ind Vs Pak Asia Cup 2022 Babar Azam Failed Against Team India Match Twitter Troll Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..