Ind Vs Pak Asia Cup 2022 :'आता होणार दंगल...', भारत-पाक सामन्याआधी ट्विटरवर युद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind Vs Pak Asia Cup 2022

Ind Vs Pak Asia Cup 2022 : 'आता होणार दंगल...', भारत-पाक सामन्याआधी ट्विटरवर युद्ध

Ind Vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आज 28 ऑगस्टला संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघ दुबईत आमनेसामने येणार आहे. सामन्याआधी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. सोशल मीडियावर फनी मीम्सही बनवले जात आहेत, जे प्रंचड व्हायरल होत आहेत. आता सर्वात मोठ्या दंगलीची पाळी आली आहे, असे अनेक चाहत्यांनी लिहिले आहे.

हेही वाचा: Asia Cup 2022 : Ind vs Pak चा नवा अध्याय; आजच्या लढतीवर क्रिकेटविश्वाचे लक्ष

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफरनेही एक दमदार व्हिडिओ ट्विट केले आहे, ज्यामध्ये तो सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहते आपापसात कसे भांडत आहेत हे दाखवत आहे. सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे फनी मीम्स बनवले गेले आहेत, ते तुम्ही येथे पाहू शकता.

हेही वाचा: Asia Cup : IND vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज! राहुल द्रविड संघात सामील

T20 विश्वचषकानंतर दोन्ही संघांमधील हा पहिला सामना आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केला होता, त्याच मैदानावर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पुन्हा भारत-पाक सामना होत आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

Web Title: Ind Vs Pak Asia Cup 2022 Twitter Memes Reaction Fans Fight India Vs Pakistan Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..