Virat Kohli : 1000 दिवसांपासून 'किंग कोहली' पाहत आहे 'या' क्षणाची वाट

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे.
virat kohli asia cup
virat kohli asia cup esakal

Virat Kohli IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घ विश्रांतीनंतर टीम परतणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेतली होती. विराट कोहली गेल्या 1000 दिवसांपासून एका खास क्षणाची वाट पाहत आहे, हा क्षण चाहत्यांना आशिया कप 2022 मध्ये पाहायला मिळणार आहे.

virat kohli asia cup
Ind Vs Eng: रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग, BCCI ने केला खुलासा...

विराटच्या बॅटमधून गेल्या अडीच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक आले नाही. एकेकाळी शतकाची हमी मानला जाणारा हा फलंदाज आता प्रत्येक धावांसाठी तळमळत आहे. विराट कोहलीला आता शेवटचे शतक करू 1000 दिवस झाले आहे. काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे, त्यामुळे आशिया कप 2022 मध्ये धावा करणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. टीम इंडियाला आशिया कपनंतर टी-20 वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धाही खेळायची आहे.

virat kohli asia cup
Natasa Stankovic : बीचवर हॉट लूकमध्ये हार्दिक पांड्याची बायको म्हणाली- मला इथे बिकिनीची गरज...

विराट कोहलीने 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक केले आहे. या सामन्यानंतर विराटने 68 सामने खेळले आहेत, पण एकही शतक झळकावलेले नाही. विराट कोहलीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 दिवस झाले आहे शतक केले नाही. आशिया कपमध्येही विराट कोहलीचे आकडे चांगलेच आहेत. अशा स्थितीत त्याला या स्पर्धेत पुनरागमन करण्याची चांगली संधी आहे. विराट कोहली चौथ्यांदा आशिया कपचा भाग होणार आहे. विराटने आशिया चषक वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 16 सामन्यात 63.83 च्या सरासरीने 766 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटने पाच सामन्यांमध्ये 76.50 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत.

virat kohli asia cup
VIDEO : 'तू चहल भाईची जागा घेतलीस...' दीपक चाहर - अक्षरने युझवेंद्रला केले ट्रोल | Yuzvendra Chahal

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणार्‍या सामन्यासह विराट कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा जगातील दुसरा आणि पहिला भारतीय खेळाडू बनेल. विराट कोहलीपूर्वी रॉस टेलरने तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळले आहेत. आतापर्यंत फक्त रोहित शर्मानेच भारतासाठी 100 टी-20 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com