IND vs PAK World Cup 2023: ODI वर्ल्डकप पाकिस्तान भारतातच खेळणार; ICCने चर्चांना लावला पूर्णविराम

एकदिवसीय वर्ल्डकपमधील सामने बांगलादेशमध्ये नाहीत; आयसीसी
IND vs PAK World Cup 2023
IND vs PAK World Cup 2023

India vs Pakistan World Cup 2023 : 'पाकिस्तानचे एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेमधील सामने बांगलादेशमध्ये आयोजित करण्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसून, तसे होण्याची शक्यता सुद्धा कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) व्यक्त केले आहे.

एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत भारतात खेळविण्यात येणार आहे. परंतु भारत आमच्या देशात आशियाई क्रिकेट करंडक खेळायला आला नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्या देशात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा खेळायला जाणार नाही अशी धमकी पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने दिली होती. त्यामुळे पाकला विश्वकरंडक स्पर्धेतील त्यांच्या लढती भारतातच खेळाव्या लागणार आहेत.

IND vs PAK World Cup 2023
IPL 2023 : आयपीएल महोत्सव आजपासून! १० संघ, ५२ दिवस आणि ७० सामन्यांची साग्रसंगीत मेजवानी

पाकिस्तानचा संघ त्यांचे विश्वकरंडक स्पर्धेमधील सामने बांगलादेशमध्ये खेळेल अशी अफवा पसरत आहे. मात्र आयसीसीने अश्या प्रकारची कोणतीही अधिकृत चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आयसीसीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये राजकीय वातावरण सध्या प्रतिकूल आहे. मात्र यामुळे पाकिस्तानचे विश्वकरंडकामधील सामने बांगलादेशमध्ये खेळविण्यात येतील अशी आमची कुठलीही योजना नसून या याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डमध्ये (बीसीबी) चर्चा झाली असल्यास त्याची माहिती आमच्या पर्यंत आलेली नाही'

पाकचा उतावीळपणा

बांगलादेश विश्वकरंडकाचे आयोजन करणार नाही. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा संपूर्णपणे भारतात होणार आहे. त्यामुळे जर पाकिस्तानचा संघ उपांत्य किंवा अगदीच अंतिम फेरीपर्यंत पोचला तर हे महत्वाचे सामने बांगलादेशमध्ये कसे काय आयोजित | करण्यात येणार. भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेटमध्ये सहभागी व्हावा म्हणून त्यांच्यातर्फे अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने केला आहे.

IND vs PAK World Cup 2023
International Olympic Committee : रशिया, बेलारूस खेळाडूंबाबत आयओसी प्रयत्नशील

व्हिसाचा त्रास होणार नाही

आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आम्ही विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच देशांच्या खेळाडूंना व्हिसा योग्य वेळी देणार आहोत अशी ठाम भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने घेतली आहे. या आयसीसीच्या बैठकीमध्ये भारत आमच्या देशामधील खेळाडूंना व्हिसा देणार नाही, अशी अनाठायी भीती पीसीबीच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com