IND vs SA : भारत - आफ्रिका टी-20 सामना 'फ्री' कुठे पहायचा माहिती नसेल तर जाणून घ्या...

शेवटच्या षटकांची गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय
India vs South Africa
India vs South Africasakal

India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे खेळल्या जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने यावर्षी जून महिन्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळे वाहून गेला.

भारताने अलीकडेच तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केला आहे. टीम इंडियाला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. मात्र शेवटच्या षटकांची गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या मालिकेत कर्णधार रोहितला या कमकुवतपणावर काम करायला आवडेल. जाणून घेऊया मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या प्रसारण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती...

India vs South Africa
Chahal-Dhanashree : युजवेंद्र चहल बायको सोबत झाला रोमँटिक - पाहा व्हिडिओ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरम मधील स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळल्या जाणार आहे.

सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

India vs South Africa
Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरची पाचव्या स्थानावर झेप

दोन्ही संघांपैकी 11 खेळण्याची शक्यता

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्केरम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन, तबरेज शम्सी.

India vs South Africa
Magnus Carlsen : विश्वविजेत्या कार्लसनचा निमनवर गंभीर आरोप
  • पहिला टी-20 सामना – 28 सप्टेंबर, 7 वाजता (थिरूवनंतपुरम)

  • दुसरा टी-20 सामना – 2 ऑक्टोबर, 7 वाजता (गुवाहाटी)

  • तिसरा टी-20 सामना – 4 ऑक्टोबर, 7 वाजता (इंदूर)

एकदिवसीय मालिका

  • पहिली वन डे : 6 ऑक्टोबर, लखनौ, दुपारी 1.30 वाजता

  • दुसरी वन डे : 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता

  • तिसरी वन डे : 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com