Chahal-Dhanashree : युजवेंद्र चहल बायको सोबत झाला रोमँटिक - पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma

Chahal-Dhanashree : युजवेंद्र चहल बायको सोबत झाला रोमँटिक - पाहा व्हिडिओ

Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma : भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याची पत्नी धनश्री वर्माला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. चहलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे आणि धनश्रीचे सुंदर क्षण पाहायला मिळतात आहेत. याशिवाय चहलने या व्हिडिओसोबत एक हृदयस्पर्शी संदेशही लिहिला आहे.

चहलने त्याचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पोस्ट केला. यासोबत त्याने पत्नीसाठी मेसेजमध्ये लिहिले की, माझ्या चांगल्या-वाईट काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद आहे. यासह मी माझ्या सर्वात चांगली आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या पत्नीला तुझ्या रुपात मिळवून धन्य झालो आहे. आज उद्या आणि पुढील अनेक वर्षांसाठी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू लवकरात लवकर बरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यात होणार कसोटी मालिका?, इंग्लंड बोर्डाने दिली ऑफर

चहल ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत खेळला होता. गेल्या काही काळापासून तो त्याची लय शोधत आहे. गेल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये त्याने फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. आता तो 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत खेळणार आहे.

धनश्रीच्या नुकतीच गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आहे. डान्स करताना तिला दुखापत झाली होती. धनश्री वर्मा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असून आपल्या चाहत्यांच मनोरंजन करण्यासाठी सतत नवीन व्हिडिओ शेअर करते. चहल आणि धनश्रीने प्रेमात पडल्यानंतरच्या तीन महिन्यातच लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 डिसेंबर 2022 मध्ये लग्नगाठ बांधली.