IND vs SA: मालिका सुरू होण्याच्या काही तास आधी भारताला मोठा धक्का!

IND vs SA
IND vs SA

IND vs SA: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला टी-२० सामना आज (१० डिसेंबर) किंग्समीडच्या डर्बन मैदानावर खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला वेगवान गोलंदाजाच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. यामुळे सूर्यकुमार यादवच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे.  टीम इंडियाची टीम 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेत पोहोचली होती, पण त्यावेळी दीपक चाहर टीमसोबत गेला नव्हता. आता मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात खेळणे त्याच्यासाठी जवळपास अशक्य आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यापूर्वी दीपक चाहर आपल्या घरी रवाना झाला होता, ज्यामध्ये त्याच्या कुटुंबातील एक सदस्य गंभीर आजारी असल्याची बातमी समोर आली होती. (Latest Sports News)

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दीपक अद्याप डर्बनमधील संघात सामील झालेला नाही. कारण कुटुंबातील जवळच्या सदस्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने त्याने विश्रांतीसाठी परवानगी घेतली होती. त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या प्रकृतीवर अवलंबून तो आगामी काळात संघात सामील होऊ शकतो किंवा नाही.

IND vs SA
BBL : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! पावसामुळे नाही तर 'या' कारणामुळे सामना झाला रद्द

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे कर्णधार पद सांभाळताना दिसणार आहे, तर रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय पुढील वर्षी होणार्‍या टी-20 विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवही या फॉरमॅटसाठी संघात पुनरागमन करताना दिसत आहेत.

भारताला या टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला खेळायचा आहे, तर दुसरा सामना 12 आणि तिसरा सामना 14 डिसेंबरला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे.

IND vs SA
Ind vs Pak : पाकिस्तान विरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव! 8 विकेटने लोळवलं, बीडच्या पठ्ठ्याची खेळी व्यर्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com