IND vs SL: रोहितचे वाढले टेंशन! पंतच्या अनुपस्थितीत ODI मालिकेत कोण करणार विकेटकीपिंग

राहुलसाठी रोहित शर्मा करणार इशानचा त्याग ?
ind vs sl 1st odi
ind vs sl 1st odisakal

India vs Sri Lanka ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 10 जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावर खेळल्या जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे दिग्गज खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परतत आहेत. पण ऋषभ पंत वनडे मालिकेचा भाग नाही. ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्याने वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर भारतीय संघाची सर्वात मोठी चिंता ही आहे की पंतच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत इशान किशन किंवा केएल राहुल यापैकी कोणाला विकेटकीपिंगसाठी संघात स्थान मिळेल.

ind vs sl 1st odi
.....अन् चहलने घेतला सुर्यकुमार यादवचा Kisssss, व्हिडीओ व्हायरल

केएल राहुलकडे विकेटकीपिंगचा अफाट अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. बांगलादेश दौऱ्यावर त्याने भारतीय संघासाठी यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो मधल्या षटकांमध्ये खेळताना दिसू शकतो. राहुल दीर्घकाळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. अशा स्थितीत त्याला श्रीलंकेविरुद्ध लय साधायची आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1760 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करताना त्याने 26 झेल आणि 2 स्टंपिंग केले आहेत.

ind vs sl 1st odi
IND vs SL 1st ODI: एकही रुपया पण खर्च करण्याची गरज नाही; येथे पहा सामना 'फ्री'

इशान किशन हा स्फोटक फलंदाजीत माहिर खेळाडू आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 210 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीसाठी तो प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी विकेटकीपिंग करताना 3 झेल आणि 1 स्टंपिंग केले आहे. अशा स्थितीत अनुभव पाहता कर्णधार रोहित शर्मा केएल राहुलची यष्टिरक्षक म्हणून निवड करू शकतो.

ind vs sl 1st odi
PCB घेणार मोठा निर्णय; अफ्रिदी होणार निवड समितीचा अध्यक्ष

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 162 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 93 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ केवळ 57 सामने जिंकू शकला आहे. 11 सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर गेल्या 37 वर्षांपासून श्रीलंकेचा संघ भारतात वनडे मालिका जिंकू शकलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com