IND vs SL: शेवटचे षटक टाकण्यासाठी अक्षरलाच का निवडले? हार्दिक म्हणाला, मला धोका...

हार्दिक तंदुरुस्त होता… मग त्याने शेवटचे ओव्हर का टाकले नाही… सामन्यानंतर दिलेले कारण
 ind vs sl 1st t20i why hardik pandya didnt bowl last over axar patel bring victory in last ball
ind vs sl 1st t20i why hardik pandya didnt bowl last over axar patel bring victory in last ball sakal
Updated on

India vs Sri Lanka 2023 : मुंबईत खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेच्या संघाने आठ विकेट्स गमावल्या होत्या, पण असे असतानाही दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली हा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्यात कायम राहिला. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. त्याच्या फक्त दोन विकेट्स शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत कर्णधार हार्दिक पांड्या स्वत: पुढे येऊन गोलंदाजीची जबाबदारी घेईल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही.

 ind vs sl 1st t20i why hardik pandya didnt bowl last over axar patel bring victory in last ball
IND vs SL : कॅप्टन हार्दिक पांड्याने वानखेडेवर रचला इतिहास; डिफेंड करण्यात ठरला टायगर

अखेरच्या षटकात भारतीय चाहत्यांनी श्वास रोखून धरला. हार्दिकने गोलंदाजी करायला न येऊन मोठी चूक केली की काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अक्षरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चमिका करुणारत्नेने षटकार ठोकला. इथून पाहुण्यांना विजयासाठी अवघ्या तीन चेंडूत पाच धावा हव्या होत्या. सामना हातातून निसटल्यासारखे वाटत होते. क्षेत्ररक्षणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे काळजीवाहू कर्णधाराने शेवटचे षटक न टाकण्याचा निर्णय घेतला असावा, असे प्रश्नही काही चाहत्यांच्या मनात निर्माण होत होते. सामन्यानंतर हार्दिकने यामागचे खरे कारण सांगितले.

 ind vs sl 1st t20i why hardik pandya didnt bowl last over axar patel bring victory in last ball
IND vs SL : w,w,w,w शिवमची सुंदरम कामगिरी तर अक्षरने खेचून आणला शेवटच्या चेंडूवर नव्या वर्षातला पहिला विजय

अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशी बोलताणा हार्दिक म्हणाला की, “मला या संघाला कठीण परिस्थितीत ठेवायचे होते कारण असे केल्याने आम्हाला मोठ्या सामन्यांमध्ये मदत होईल. अनेकदा आम्ही द्विपक्षीय मालिकांमध्ये चांगली कामगिरी करतो. हा एक चांगला मार्ग आहे ज्याद्वारे आपण स्वतःला आव्हान देऊ शकतो. हे सर्व तरुण गन आहेत ज्यांना परिस्थितीतून बाहेर पडून खेळण्याची संधी मिळाली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गडी गमावून 162 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा बचाव करताना भारताला शेवटच्या चेंडूवर विजय मिळाला. यासह नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com