IND vs SL: मानलं हार्दिक! स्टार सूर्या झंजावात तरी कर्णधाराची राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hardik pandya

IND vs SL: मानलं हार्दिक! स्टार सूर्या झंजावात तरी कर्णधाराची राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप

IND vs SL 3rd T20I: भारतीय क्रिकेट संघाने 2023 ची सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने 2-1 ने विजय मिळवला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शनिवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 91धावांनी विजय मिळवला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे.

या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने झटपट शतकी खेळी खेळली. सूर्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. या सामन्यात सूर्याशिवाय इतर अनेक भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला ते जाणून घेऊया.

हेही वाचा: IND vs SL: शाब्बास रे पठ्ठ्या! सूर्याच्या शतकावर विराटने इंस्टावर लावली आग

सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, मला वाटते की प्रत्येक डावात फलंदाजी करताना सूर्या सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. फलंदाजी खूप सोपी आहे, असे तो सांगत आहे. जर मी गोलंदाजी करत असेन, तर त्याची फलंदाजी पाहून माझी निराशा होईल. विशेषतः राहुल त्रिपाठीसाठी चेंडू स्विंग येत होता. पण त्याने उत्तम खेळ दाखवला. यानंतर सूर्याने हे काम केले. तुम्हाला त्याला काहीही सांगण्याची गरज नाही, त्याला काय करायचे ते माहित आहे. जर अशी परिस्थिती असेल जिथे त्याला खात्री नसेल, तर आम्ही गप्पा मारतो, परंतु बहुतेक त्याला काय करावे हे माहित आहे.

हेही वाचा: IND vs SL: सूर्य तापला अन् लंकेचं झालं दहन! मालिका हार्दिकच्या खिशात

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, मला अक्षरचा खूप अभिमान आहे, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो आणि क्रमवारीत फटकेबाजी करतो. यामुळे त्याला आणि संघाला खूप आत्मविश्वास मिळतो. कर्णधार म्हणून माझ्या आयुष्यातील माझे ध्येय माझ्या खेळाडूंना पाठीशी घालणे आहे. हे भारतातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटू आहेत, म्हणूनच ते येथे आहेत. या फॉरमॅटमध्ये शंका घेण्यास जागा नाही आणि आम्ही योग्य मार्गाने खेळाडूंना पाठीशी घालत आहोत. आम्ही मालिकेत ज्या पद्धतीने खेळलो ते आनंददायक आहे. दुसऱ्या सामन्यात आम्ही आमची 50 टक्केही खेळू शकलो नाही पण तरीही आम्ही चांगली कामगिरी केली.