IND vs SL Playing 11: फायनलमध्ये कर्णधार रोहित टीम इंडियाच्या प्लेइंग-11 करणार मोठे बदल, कोण जाणार बाहेर?

IND vs SL Asia Cup 2023 Final Playing 11
IND vs SL Asia Cup 2023 Final Playing 11

IND vs SL Asia Cup 2023 Final Playing 11 : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुपर-4 सामन्यात पराभूत झालेल्या संघात भारताला अनेक बदल करायचे आहेत. श्रीलंकेविरुद्ध अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे.

IND vs SL Asia Cup 2023 Final Playing 11
IND vs SL Asia Cup Final : आज रंगणार भारत-श्रीलंका अंतिम सामना, जाणून घ्या पावसाची शक्यता किती?

अनुभवी फलंदाज विराट कोहली, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. या तिघांचे पुनरागमन निश्चित आहे. आता पहिल्या दोन सामन्यांनंतर संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर पुनरागमन करतो की नाही हे पाहायचे आहे. दुखापतीमुळे अय्यर सुपर-4 मध्ये एकही सामना खेळू शकला नाही. तो फायनलमध्येही खेळणार हे निश्चित नाही.

विराट कोहलीला विश्रांती देऊन भारताने तिलक वर्माला आजमावले पण या युवा खेळाडूला बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवची वनडे फॉरमॅटमध्ये निराशाजनक कामगिरी कायम आहे.

IND vs SL Asia Cup 2023 Final Playing 11
Team India Squad : संघ निवडीनंतर BCCI ने अचानक केला मोठा बदल! टीम इंडियातून 'हे' खेळाडू बाहेर

अशा परिस्थितीत भारत सुपर-4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध जिंकलेल्या प्लेइंग-11ला अक्षर पटेल वगळता अंतिम फेरीत उतरवेल. अक्षर पटेलला गेल्या सामन्यात मनगटाची दुखापत झाली होती. भारतीय क्रिकेट संघाने वॉशिंग्टन सुंदरला कव्हर म्हणून बोलावले आहे. आता सुंदर खेळणार की नाही हे पूर्णपणे खेळपट्टीवर अवलंबून असेल.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील. कुलदीप यादवही परतणार आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे बाहेर पडणे निश्चित आहे.

वॉशिंग्टन सुंदरला संघात येणार की शार्दुल ठाकूर खेळणार हे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासमोर मोठे आव्हान असेल. प्रेमदासा स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. शार्दुलपेक्षा सुंदरची फलंदाजी सरस आहे. अशा परिस्थितीत त्यांचा वरचष्मा दिसत होता.

भारत आणि श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समराविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (सी), दुनिथ वेलालागे, प्रमोद मदुशन/दुशान हेमंथा, कसुन राजिथा, मथिशा पाथिराना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com