
IND vs SL: जळका पांड्या! सूर्याच्या फटकेबाजीवर झाला नाराज...
Suryakumar Yadav IND vs SL : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करून मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. त्याने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकार मारत नाबाद 112 धावांची खेळी केली.
भारतीय फलंदाजांनी एकामागून एक जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने केवळ 45 चेंडूत शतक पूर्ण केले. या विजयानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानेही त्याचे जोरदार कौतुक केले. मात्र, सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीने आपली निराशा झाली असती, असेही त्याने सांगितले.
हेही वाचा: IND vs SL: मानलं हार्दिक! स्टार सूर्या झंजावात तरी कर्णधाराची राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप
हार्दिक पांड्या म्हणाला की सूर्या सर्वांना आश्चर्यचकित करत आहे आणि त्याने सांगितले की, जर मी गोलंदाज असतो तर त्याने खेळलेल्या फटक्यांमुळे मी निराश झालो असतो. त्याने एकामागून एक अंदाधुंद फटके खेळले. सूर्याबद्दल फार काही सांगायची गरज नाही.
पांड्याने मालिकेवीर ठरलेल्या अक्षर पटेलचेही कौतुक केले. त्याला त्याचा खूप अभिमान असल्याचे सांगितले. या मालिकेतून त्याला खूप आत्मविश्वास मिळेल. खेळाडूंना पाठिंबा देणे हाच माझा उद्देश असल्याचे भारतीय कर्णधार म्हणाला. तो टी-20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आहे. तो ज्या प्रकारे खेळला त्याप्रमाणे मी खूप आनंदी आहे.
हेही वाचा: Umran Malik: स्पीड गनची जादू; असा क्लीन बोल्ड केला की स्टंपने हवेत घेतली सहा वेळा गुलाटी - Video
राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षटकात 5 विकेट गमावत 228 धावा केल्या. सूर्याशिवाय सलामीवीर शुभमन गिलने 46 आणि राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 35 धावा फटकावल्या. अक्षर पटेलने 9 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
हेही वाचा: Team India: टीव्हीचा 'हा' फ्लॉप स्टार ठरवणार कोहली अन् रोहितचं भविष्य! BCCI ने दिली मोठी जबाबदारी
भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाला 16.4 षटकांपेक्षा जास्त वेळ लक्ष्याचा पाठलाग करू दिला नाही. पाहुण्यांचा संपूर्ण संघ 137 धावांत ऑलआऊट झाला. अर्शदीप सिंगने 20 धावांत 3 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना 2-2 यश मिळाले. अक्षर पटेलने या संपूर्ण मालिकेत एकूण 117 धावा केल्या आणि 3 बळी घेतल्या.