IND Playing 11 : टीम इंडियातील 'पुष्पा'ची एन्ट्री फिक्स है भाऊ!

Ravindra Jadeja
Ravindra JadejaSakal

India vs Sri Lanka T20 : वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतून अष्टपैलू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टीम इंडियात कमबॅक करणं जवळपास पक्क आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातील (Team India) तो महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याची उत्सुकता असेल. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई अशी फिरकी जोडी पाहायला मिळाली होती. रविंद्र जाडेजाच्या एन्ट्रीमुळे यातील एकाला विश्रांती दिली जाऊ शकते.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी दीपक चहर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पण जसप्रित बुमराह विश्रांती घेऊन पुन्हा संघात येत असल्यामुळे ही उणीव भासणार नाही. तो भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांच्यासोतब भारतीय जलदगती गोलंदाजीची धूरा सांभाळेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा डावाला सुरुवात करताना दिसू शकेल. यावेळी त्याच्यासोबत ऋतूराज येणार की ईशान किशन हे पाहण्याजोगे असेल.

Ravindra Jadeja
आरे कॉल बॅक करशील का? रितिकानं घेतली रोहितची फिरकी

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यापूर्वी (India vs Sri Lanka Series) चहलने खास अंदाजात जड्डूचे स्वागत केले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक मजेशीर फोटो शेअर केले आहे. युजवेंद्र चहलने जो फोटो शेअर केलाय त्यात जाडेजाच्या गळ्यात हार आणि केसात गजरा असे भन्नाट एडिटिंग केल्याचे दिसते. इन्स्टा स्टोरी शेअर करताना त्याने पुष्पाचा हॅश टॅगही दिलाय. संघाबाहेर असताना रविंद्र जाडेजाने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटातील के डायलॉगचे अनेक रील बनवले होते. सोशल मीडियावर त्याला चांगली पसंतीही मिळाली होती. रविंद्र जाडेजा नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही तो संघाचा भाग होता. पण दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून माघार घ्याव लागली. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही मुकला होता.

Ravindra Jadeja
ती गोष्ट कायम सलत राहील; वर्ल्ड कप आधी मितालीचं मोठ वक्तव्य

भारतीय संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, ऋतूराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, रविंद्र जाडेजा, रवि बिश्नोई/ युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com