ती गोष्ट कायम सलत राहील; वर्ल्ड कप आधी मितालीचं मोठ वक्तव्य

Mithali Raj
Mithali RajSakal

वनडे वर्ल्ड कप आधी मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. पुढच्या महिन्यात 4 मार्चपासून महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. भारतीय महिला संघ पाकिस्तान महिला संघा विरुद्धच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात करेल. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतरही आपला संघ वर्ल्ड कप जिंकू (World Cup) शकतो, असा विश्वास मिताली राजनं व्यक्त केलाय.

मिताली राज (Mithali Raj) हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन वेळा वर्ल्ड कपची फायनल खेळली आहे. यावेळी काहीतरी करुन दाखवण्याची वेळ आहे, असे तिने म्हटले आहे. दोन वेळा जवळ येऊन पोहचल्यानंतर आता फक्त करायचे बाकी आहे. संघाची क्षमता वर्ल्ड कप जिंकण्याहून अधिक आहे, असेही मितालीने म्हटले आहे.

Mithali Raj
CSKचा 'हा' खेळाडू म्हणतो, IPL लिलावात जनावर असल्यासारखे वाटते

आयसीसीसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये मितालीनं संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केलाय. तिने लिहिलंय की, आमची क्षमता ट्रॉफी जिंकण्याच्याही पलीकडची आहे. ते आम्ही दाखवून दिले आहे. 2017 च्या फायनल अजूनही विसरलेले नाही. लॉर्डर्स वर रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात मैदान फुल्ल भरले होते. त्यावेळी अधूरी राहिलेली गोष्ट कायम सलत राहील, असा उल्लेखही मितालीनं आपल्या लेखात केलाय.

Mithali Raj
IND vs SL :टीम इंडियाला धक्का, टी-20 मालिकेतून दीपक चहर आउट

वर्ल्ड कप आधी मितालीला सतावतेय या गोष्टीची चिंता

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय महिला संघाची फलंदाजी भक्कम असल्याचे दिसून आले.पण गोलंदाजीमध्ये कमजोरी दिसून आली. सुमार गोलंदाजीमुळे पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ 4-0 असा मागे पडला. चौथ्या सामन्यातील पराभवानंतर आता मिताली राजला गोलंदाजीची चिंता सतावत आहे. गोलंदाजीमध्ये आम्ही सातत्य राखण्यात अपयशी ठरतो. सीम आणि स्पिन यांचे योग्य कॉम्बिनेशन राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असा उल्लेखही तिने केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com