
IND vs SL: 'ऑल इज वेल...', दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या संजूच्या पोस्टमुळे चाहते कन्फ्यूज?
India vs Sri Lanka Sanju Samsons Post : भारतीय संघाचा आश्वासक खेळाडू संजू सॅमसन दुखापतीमुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. असे सांगितले जात आहे की पहिल्या टी-20 सामन्यात तो कॅच घेण्यासाठी डायव्हिंग करताना जखमी झाला होता.
यादरम्यान त्याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळेच तो दुसऱ्या टी-20 सामन्यात सहभागी होण्यासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या जागी महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली.
हेही वाचा: IND vs Sl: लंकेचा कर्णधार शनाका 'गोरा असता तर IPL मध्ये पडला असता पैशांचा पाऊस'
टी-20 मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने त्याच्या इंस्टाग्रामवर अशी पोस्ट टाकली ज्यामुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला. स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याने लिहिले, 'ऑल इज वेल.' संजूची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तंदुरुस्त असूनही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असे कर नाही ना, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.
पहिल्या टी-20 सामन्यातील संजू सॅमसन काही विशेष करिष्मा दाखवू शकला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडलेल्या भारतीय संघासाठी तो चौथ्या क्रमाने फलंदाजीला उतरला. यादरम्यान संजू सॅमसन सहा चेंडूत अवघ्या पाच धावा करून डी सिल्वाचा बळी ठरला. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.