IND vs SL: जय शहांनी घोषणा केली अन् भारताकडून 294 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची कारकिर्दच संपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian cricket team Bhuvneshwar Kumar

IND vs SL: जय शहांनी घोषणा केली अन् भारताकडून 294 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची कारकिर्दच संपली

Indian Cricket Team Bhuvneshwar Kumar : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 आणि ODI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल तर टी-20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. रोहितला टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. त्याला विश्रांती देण्यात आल्याचे समजते.

निवड समितीने दोन्ही फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना संघात स्थान मिळालेले नाही. यामध्ये युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंना कोणत्याही संघात स्थान मिळवता आलेले नाही.

हेही वाचा: Suryakumar Yadav : कॅप्टन्सीचा सूर्योदय! अवघ्या 1 वर्षीत सूर्या झाला उपकर्णधार

भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नव्हता. त्याने नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची टी-२० मालिका खेळली होती. त्याच वेळी, तो जानेवारी 2022 पासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. यंदाच्या टी-20 विश्वचषक आणि आशिया कपमध्ये भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 32 वर्षीय भुवनेश्वर कुमारने भारताकडून 294 विकेट घेतल्या आहे. पण अलीकडची कामगिरी पाहता निवड समिती त्याला आता संघात संधी देण्याची शक्यता नाही.

हेही वाचा: Shikhar Dhawan : बीसीसीआयने गब्बरचा वापर केला अन् दिले फेकून

विराट कोहली आणि केएल राहुल देखील टी-20 संघात नाहीत आणि 2024 टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन विराट, राहुल आणि रोहित यांची या फॉरमॅटमध्ये निवडही होऊ शकत नाही, असे संकेत आहेत. हार्दिक पांड्याला वनडे संघात उपकर्णधार म्हणूनही निवडण्यात आले आहे तर गेल्या वर्षी चमकदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव टी-20 संघाचा उपकर्णधार असेल.

वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना पहिल्यांदाच टी-20 संघात संधी मिळाली आहे. मावीला आयपीएल लिलावात टायटन्सने 6 कोटी रुपयांना तर मुकेशला दिल्ली कॅपिटल्सने 5.5 कोटी रुपयांना विकत घेतले. ॠतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी हे देखील टी-20 संघात आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर मोहम्मद शमीने वनडे संघात पुनरागमन केले आहे.