Suryakumar Yadav : कॅप्टन्सीचा सूर्योदय! अवघ्या 1 वर्षीत सूर्या झाला उपकर्णधार

वयाच्या ३२व्या सूर्या वर्षी बनला संघाचा उपकर्णधार! बीसीसीआयने अचानक सोपवली जबाबदारी....
suryakumar-yadav India vs Sri Lanka T20 Series
suryakumar-yadav India vs Sri Lanka T20 Series

Suryakumar Yadav India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रोहित शर्माचा टी-20 संघासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता त्याच्या टी-20 संघातील स्थानाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

भारताच्या टी-20 संघात रोहितसह विराट कोहली, के. एल. राहुल या वरिष्ठ खेळाडूंनाही निवडण्यात आलेले नाही. अर्थात विश्रांतीच्या नावाखाली त्यांना बसवण्यात आले असले तरी बीसीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादवला टी-20 संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे.

suryakumar-yadav India vs Sri Lanka T20 Series
Shikhar Dhawan : बीसीसीआयने गब्बरचा वापर केला अन् दिले फेकून

निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बनवले आहे. सूर्याने 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे बीसीसीआयने त्याची वर्णी केली आहे. तो क्रीजवर येताच झटपट फलंदाजी करण्यात माहिर आहे. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. संघाकडे संजू सॅमसनच्या रूपाने आधीच अनुभवी खेळाडू होते. असे असले तरी निवड समितीने उपकर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे दिली आहे.

suryakumar-yadav India vs Sri Lanka T20 Series
Rishabh Pant: पंतचे सगळे रंग उडाले; आता दिसणार फक्त पांढऱ्या कपड्यात

सूर्यकुमार यादवला भारताचा एबी डिव्हिलियर्स म्हटले जाते. तो मैदानाच्या कोणत्याही बाजूला फटके मारू शकतो. सूर्या चांगल्या फॉर्ममध्ये धावत आहे. 2022 मध्ये त्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2022 च्या 31 टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादव आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला खेळाडू आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे. त्याने वयाच्या 31 व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केले. तर वयाच्या 32 व्या वर्षी तो संघाचा उपकर्णधार बनला आहे. सूर्याने भारतीय संघासाठी 42 टी-20 सामन्यात 1408 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 384 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com