Suryakumar Yadav: पिच नाही तर स्विमिंग टॅंक! सूर्याने सुळकी मारत लगावले षटकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surya kumar Yadav

Suryakumar Yadav: पिच नाही तर स्विमिंग टॅंक! सूर्याने सुळकी मारत लगावले षटकार

Suryakumar Yadav IND vs SL : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. या वर्षी टीम इंडियासाठी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शनिवारी सूर्यकुमारने शानदार फलंदाजी केली. सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने चौकार आणि षटकारांची बरसात केली.

हेही वाचा: IND vs SL: सूर्य तापला अन् लंकेचं झालं दहन! मालिका हार्दिकच्या खिशात

सूर्यकुमारने 45 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले. सूर्याने या खेळीत सात चौकार आणि नऊ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 219.61 होता. सूर्याने गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धही शतके झळकावली होती. राजकोटमध्ये शतक झळकावल्यानंतर त्याने स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. सूर्याने आपली बॅट हवेत फिरवत प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले आणि अक्षर पटेलला मिठी मारून हसायला लागला. टीम इंडियाच्या खेळाडूंनीही त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

हेही वाचा: IND vs SL: मानलं हार्दिक! स्टार सूर्या झंजावात तरी कर्णधाराची राहुलच्या पाठीवर कौतुकाची थाप

सूर्यकुमारने आपल्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा असे काही शॉट्स खेळले, जे पाहून सगळेच थक्क झाले. डावाच्या 13व्या षटकात दिलशान मदुशंकाविरुद्ध सूर्यकुमारने ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला आणि या वेळी तो फटका मारताना क्रीझमध्ये पडला.

हेही वाचा: IND vs SL 3rd T20: श्रीलंकेविरुद्ध अजय रथ कायम! 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली

डावाच्या 13व्या षटकात सूर्यकुमारने शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने रॅम्प शॉट खेळताना षटकारासाठी फुल टॉस मारला, हा शॉट मारताना सूर्यकुमार स्वत: क्रीझमध्ये स्विमिंग टॅंक मध्ये सुळकी मारत तसा शॉट खेळला. शॉट बघून एकदा वाटले की कदाचित तो जखमी होईल. पण डीव्हिलियर्सला आपला गुरू मानणारा सूर्यकुमार हा भारताचा मिस्टर 360 डिग्री आहे आणि आता प्रत्येक डावात दिग्गजांच्या यादीत आपले नाव जोडत आहे.

भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्यकुमार हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. त्याच्या पुढे रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावली आहेत.