IND Vs SL : अमरावतीच्या पठ्ठ्याला टीम इंडियात संधी; जाणून घ्या कोण आहे खेळाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

team india

IND Vs SL : अमरावतीच्या पठ्ठ्याला टीम इंडियात संधी; जाणून घ्या कोण आहे खेळाडू

IND Vs SL : भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या टी-२० मालिकेदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

हेही वाचा: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीच रँकिंगमध्ये मोठी खळबळ; हुड्डाने घेतली 40 स्थानांची उसळी, किशनचीही चांदी

संजू सॅमसनला दुखापत झाल्याने एका नव्या यष्टीरक्षकाला भारतीय संघात खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

मुंबईतील पहिल्या टी-२० सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील २ सामन्यात या खेळाडूला खेळवले जाणार आहे.

हेही वाचा: Steve Smith: सुवर्णसंधी हुकली! स्मिथने सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम जवळपास मोडलाच होता...

संजू सॅमसनच्या जागी संधा देण्यात आलेला खेळून देशांतर्गत क्रिकेट सामने आणि आयपीएलमध्ये खेळलेला असून, जितेश शर्मा असे संधी देण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आहे.

कोण आहे जितेश शर्मा

संजू सॅमसन ऐवजी भारतीय संघात संधी देण्यात आलेला जितेश २९ वर्षांचा असून तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळतो.

याशिवाय त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळत उत्तम फलंदाजी केली होती. आता जितेश श्रीलंकेसोबतच्या दोन सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Team IndiaSanju Samson