Ind vs Sl T20: लंकन सिंहांची शिकार करण्यात 'हे' भारतीय गोलंदाज आहे तरबेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka T-20 Series

Ind vs Sl T20: लंकन सिंहांची शिकार करण्यात 'हे' भारतीय गोलंदाज आहे तरबेज

India vs Sri Lanka T-20 Series : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी 27 डिसेंबरला संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत या मालिकेत हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतात. हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आहे.

हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडिया आणि श्रीलंका क्रिकेट संघ आतापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 26 सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 17 वेळा श्रीलंकेचा पराभव केला. 8 वेळा श्रीलंकेचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी ठरला होता. एक सामना अनिर्णित राहिला. गेल्या वेळी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संघ आमने-सामने आले होते, जिथे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा: IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेसाठी Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन कशाला! येथे पहा 'फ्री'

श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

  • युझवेंद्र चहल

    युझवेंद्र चहलसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. संघातील आपली दावेदारी आणखी मजबूत करण्यासाठी चहलला श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करावी लागणार आहे. चहलचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 मधला विक्रमही उत्कृष्ट असून तो भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. युझवेंद्र चहलने 10 सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत.

  • आर अश्विन

    बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने चमकदार कामगिरी केली आहे. अश्विन आता फक्त कसोटीतच दिसतो. अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या 7 सामन्यात 112 धावा देत 14 बळी घेतले आहेत.

  • कुलदीप यादव

    श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत त्याला चांगली कामगिरी करायची आहे आणि त्याचा विक्रमही याचा पुरावा आहे. कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या 9 सामन्यात 7.40 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट घेतल्या आहेत. सर्वांच्या नजरा कुलदीपवर खिळल्या आहेत.

हेही वाचा: IND vs SL : पाणी देण्यातच संपणार करिअर, पांड्या संधी देणार?

भारतीय टी-20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.