IND vs SL : पाणी देण्यातच संपणार करिअर, पांड्या संधी देणार?

एक खेळाडू असाही आहे ज्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणे कठीण आणि...
ind vs sl t20i series hardik pandya
ind vs sl t20i series hardik pandya sakal

India vs Sri Lanka T20 Series : भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेने करणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 3 जानेवारीपासून मुंबईत खेळल्या जाणार आहे. यासाठी संघाची निवड करण्यात आली असून कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान एक खेळाडू असाही आहे ज्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

ind vs sl t20i series hardik pandya
Rishabh Pant: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंतची जागा घेणार 'हा' दिग्गज खेळाडू

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत अष्टपैलू हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वर्षातील पहिल्या मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची जबाबदारीही त्याच्यावर असणार आहे.

ind vs sl t20i series hardik pandya
Rishabh Pant : "माझ्या आईला फोन करा", रक्तबंबाळ अवस्थेत पंत बस ड्रायव्हरला म्हणाला...

भविष्यातील टी-20 कर्णधार म्हणून आपले स्थान निश्चित करण्याची जबाबदारीही हार्दिक पांड्यावर असेल. अशा परिस्थितीत तो या तीन सामन्यांच्या मालिकेत प्रयोग करणे टाळेल. टी-20 मालिकेसाठी संघात अनेक युवा खेळाडूंची निवड झाली असली तरी अनुभवी क्रिकेटपटूंवर विश्वास ठेवण्यास हार्दिक मागे हटणार नाही. प्रयोग करून यश मिळालं तर तो हार्दिकच्या कौतुकाचा विषय ठरेल, पण तोटा झाला तर त्याच्या निर्णयांवर टीकाही सुरू होईल.

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. दरम्यान ऋतुराज गायकवाडला प्लेइंग-इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण जात आहे. वास्तविक, तो टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. आणि ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते, तो यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास तयार आहे.

शुभमन गिल देखील या मालिकेचा एक भाग आहे आणि तो दुसरा सलामीवीर असेल. त्यानंतर सूर्यकुमार यादवला क्रमांक-3 वर संधी दिली जाऊ शकते. संजू सॅमसन देखील संघाचा एक भाग आहे. त्यामुळे गायकवाड यांना तूर्तास संधीची वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com