Record @100 : शंभराव्या कसोटीत Century करणारे फलंदाज

Full list of batsmen scoring 100 in 100th Test
Full list of batsmen scoring 100 in 100th Test Sakal

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मोहालीच्या मैदानातील पहिला कसोटी सामना विराट कोहलीसाठी खास असा आहे. तो आंतरराष्ट्रीय कसोटीतील शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. मोहालीच्या मैदानात आतापर्यंत त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. जवळपास मागील दोन वर्षांपासून तो एकही शतक करु शकलेला नाही. शंभराव्या सामन्यात त्याचा शतकाचा दुष्काळ संपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठेरलं. कसोटी क्रिकेटमध्ये एवढा मोठा पल्ला गाठणे कोणत्याही क्रिकेटरसाठी मोठी गोष्ट असते. यात शतकी खेळी करणे फार कमी खेळाडूंना जमलं आहे. आतापर्यंत आठ फलंदाजांनी असा पराक्रम करुन दाखवला आहे. जाणून घेऊयात कोणत्या फलंदाजांनी आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केलीये. (IND vs SL Virat Kohli 100 Test Mohali Full list of batsmen scoring 100 in 100th Test)

1. मायकल कॉलिन काउड्रे: (Michael Colin Cowdrey)

इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या मायकल कॉलीन काउड्री यांनी शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. भारतातील केरळातील पतुमला येथे जन्मलेल्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या नावे इंग्लंडकडून शंभर कसोटी सामने खेळणारा पहिला खेळाडू होण्याचा रेकॉर्ड आहे. 1954-55 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी कसोटी पदार्पण केले. एडबस्टन, बर्मिंघमच्या मैदानात 11 जुलै 1968 मध्ये त्यांनी शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.

2. जावेद मियाँदाद (Javed Miandad)

जावेद मियाँदाद हे क्रिकेट जगतातील दुसरे आणि पाकिस्तानकडून शंभर कसोटी सामने खेळणारे पहिले खेळाडू आहेत. भारतीय संघाविरुद्ध लाहोरच्या मैदानात त्यांनी शंभरावी कसोटी खेळली. या सामन्यात त्यांनी 145 धावांची खेळी केली होती.

3. सीजी ग्रीनिज (Javed Miandad)

वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीज यांनीही शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करुन दाखवला होता. 12 एप्रिल 1990 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी 149 धावांची खेळी केली होती. याशिवाय शंभराव्या वनडेतही त्यांनी शतकी खेळी केली होती. 1988 मध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यांनी नाबाद 102 धावा ठोकल्या होत्या.

4. एजे स्टीवर्ट (AJ Stewart)

अलेक्स स्टेवर्ट इंग्लंडचा दुसरा फलंदाज आहेत ज्यांनी शंभराव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. 3 ऑगस्ट 2000 मध्ये मँचेस्टरच्या मैदानात रंगलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी 105 धावा केल्या होत्या.

5. इंजमाम-उल-हक (Inzamam-ul-Haq)

इंग्लंडशिवाय पाकिस्तानच्या दोन फलंदाजांचा या खास यादीत समावेश आहे. जावेद मियाँदाद यांच्यानंतर इंजमाम हुल हक यांनी शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. बंगळुरुच्या मैदानात भारता विरुद्ध त्यांनी शंभरावा सामना खेळला. 24 मार्च 2005 मध्ये त्यांनी हा पराक्रम करुन दाखवला होता.

6. रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting)

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने शंभराव्या कसोटीतील दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. 2 जानेवारी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी खास कमाल करुन दाखवली. पहिल्या डावात 120 आणि दुसऱ्या डावात 143 अशी खेळी पाँटिंगनं केली होती.

7. ग्रॅहम स्मिथ (Ricky Ponting )

संघाला सर्वाधिक कसोटी सामने (53) जिंकून देणारा कर्णधार असा खास रेकॉर्ड आपल्या नावे असलेला दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅहम स्मिथही या क्लबमध्ये सामील आहे. 19 जुलै 2012 ओव्हलच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध त्याने 131 धावांची खेळी केली होती.

8. हाशिम आमला (Hashim Amla)

दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलानेही शंभराव्या कसोटीत शतकी खेळी करुन दाखवली होती. 12 जानेवारी 2017 मध्ये जोहन्सबर्गच्या घरच्या मैदानात त्याने श्रीलंकेविरुद्ध 134 धावांची खेळी साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com