Shreyas Iyer : 'मी किती पुल शॉट्स खेळले पाहिले का?' शॉर्ट बॉलच्या प्रश्नावर श्रेयस अय्यर संतापला

IND vs SL World Cup 2023 Shreyas Iyer
IND vs SL World Cup 2023 Shreyas Iyersakal

IND vs SL World Cup 2023 Shreyas Iyer : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने आपली विजयी मोहीम सुरू ठेवली आहे. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडविला आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या उपांत्य फेरीत धडक मारली.

या सामन्यात टीम इंडियाच्या विजयात श्रेयस अय्यरनेही महत्त्वाचे योगदान दिले, त्याने 56 चेंडूत 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर अय्यरची बॅट गेल्या काही सामन्यांपासून शांत दिसत होती. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. आता अय्यरने आपल्या खेळीच्या जोरावर टीकाकारांना नक्कीच उत्तर दिले आहे.

IND vs SL World Cup 2023 Shreyas Iyer
World Cup 2023 : भारत उपांत्य फेरीत; श्रीलंकेवर ३०२ धावांनी विक्रमी विजय

गेल्या काही सामन्यात शॉट बॉल्स खेळताना श्रेयस अय्यरला अडचणीचा सामना करायला लागला होता. आणि हे त्याच्या फलंदाजीतील कमकुवतपणा म्हणून पाहिले जाते. अय्यर अनेकदा अशा चेंडूंवर विकेट गमावताना दिसला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अय्यरला या कमकुवतपणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो त्यावर चांगलाच संतापलेला दिसला.

IND vs SL World Cup 2023 Shreyas Iyer
IND vs SA World Cup 2023 : भारताला आम्ही हरवले आहे; रॅसी वॅन डर ड्युसेन

या प्रश्नावर उत्तर देताना अय्यर म्हणाला की, जेव्हा तुम्ही म्हणता की एखादी गोष्ट माझी समस्या आहे, तेव्हा नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी किती पुल शॉट्स खेळले आहेत ते तुम्ही पाहिले आहे का, त्यापैकी बरेच बाऊंड्रीला गेले आहेत. जर तुम्ही बॉल मारला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आऊट होऊ शकता. इनस्विंग बॉल मी जर दोन किंवा तीन वेळा नीट खेळलो नाही. तर तुम्ही म्हणता हा खेळाडू इनस्विंग बॉल खेळू शकत नाही. एक खेळाडू म्हणून तुम्ही कोणत्याही बॉलवर आऊट होऊ शकता. हे सर्व वातावरण तुम्ही लोकांनी बाहेर निर्माण केले आहे.

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, मी मुंबईहून आलो आहे आणि वानखेडे खेळपट्टीवर मी खूप खेळलो आहे जिथे भारतातील इतर मैदानांच्या खेळपट्ट्यांच्या तुलनेत जास्त उसळी दिसून येते. मी येथे बहुतांश सामने खेळले आहेत आणि त्यामुळेच बाऊन्स झालेल्या चेंडूंचा सामना कसा करायचा हे मला चांगलेच माहीत आहे. जेव्हा तुम्ही बाऊन्स झालेले बॉल मारायला जाता तेव्हा तुम्ही आऊट होऊ शकता, तर कधी कधी ते तुमच्या बाजूनेही जाते. असे होऊ शकते की जेव्हा मी असे बॉल मारायला गेलो असतो, तेव्हा बहुतेक वेळा मी आऊट झालो आहे, त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना वाटते की ही माझ्यासाठी समस्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com