IND vs WI T20 WC: दीप्ती अन् ऋचा पुढे वेस्टइंडीजने टाकल्या नांग्या! भारताचा सलग दुसरा मोठा विजय

वेस्ट इंडिजचा धुव्वा उडाला, उपांत्य फेरीकडे वाटचाल
IND vs WI India beat West Indies 6 wkts India second win Women T20 World Cup 2023 Deepti Sharma record  Harmanpreet Kaur cricket news in marathi
IND vs WI India beat West Indies 6 wkts India second win Women T20 World Cup 2023 Deepti Sharma record Harmanpreet Kaur cricket news in marathi

IND vs WI Women’s T20 World Cup 2023 : महिला टी-20 विश्वचषकमध्ये भारताने पाकिस्ताननंतर वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अप्रतिम सामना खेळल्या गेला. भारतीय संघाने हा सामना सहा गडी राखून जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 118 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 18.1 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून दीप्ती शर्माने दमदार गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.

IND vs WI India beat West Indies 6 wkts India second win Women T20 World Cup 2023 Deepti Sharma record  Harmanpreet Kaur cricket news in marathi
Deepti Sharma: रचला इतिहास! जे कुणालाही जमलं नाही ते दीप्तीने करून दाखवलं

वेस्ट इंडिजने दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दमदार झाली. पहिल्या षटकात भारतीय संघाने 14 धावा केल्या. शेफाली वर्माने पहिल्याच षटकात तीन चौकार मारले. चौथ्या षटकात 32 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. करिश्मा रामहरेकने स्मृती मंधानाला 10 धावांवर बाद केले. पुढच्याच षटकात दुसरा धक्का बसला.

हेली मॅथ्यूजने जेमिमा रॉड्रिग्जला एक धावावर झेलबाद केले. जेमिमाने पाकिस्तानविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी खेळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात ती अपयशी ठरली. भारताला आठव्या षटकात शेफाली वर्माला करिश्माने झेलबाद केले. शेफालीला 23 चेंडूत 28 धावा करता आल्या. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले. यानंतर हरमनप्रीत आणि घोष यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीत कौरने 33 आणि ऋचा घोषने नाबाद 44 धावा केल्या.

IND vs WI India beat West Indies 6 wkts India second win Women T20 World Cup 2023 Deepti Sharma record  Harmanpreet Kaur cricket news in marathi
ICC Test Ranking: आयसीसीने भारताला पुन्हा एकदा गंडवलं! काही तासांत सिंहासनावरून उतरवले खाली

त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकातच हेली मॅथ्यूजच्या रूपात संघाला पहिला धक्का बसला. कर्णधाराला केवळ दोन धावा करता आल्या. यानंतर कॅम्पबेल आणि टेलरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दीप्ती शर्माने ही धोकादायक भागीदारी तोडली. त्याच षटकात त्याने कॅम्पबेल (30) आणि टेलर (42) यांना बाद केले. यानंतर वेस्ट इंडिज संघावर दबाव आला आणि 20 षटकांत केवळ 118 धावाच करू शकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com