रोहित युगात पाहुण्यांना 'व्हाईट वॉश' देण्याचा 'सिलसिला' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

रोहित युगात पाहुण्यांना 'व्हाईट वॉश' देण्याचा 'सिलसिला'

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानात पाहुण्या संघाला व्हाईट वॉश देण्याचा 'सिलसिला' वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेतही कायम राहिला. टीम इंडियाने (Team India) आणखी एक विजय नोंदवत कॅरेबियन संघाचा सुपडा साफ केला. वनडे मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर टी-20 मध्येही वेस्ट इंडीजवर व्हाईट वॉशची नामुष्की ओढावली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाची धूरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आली. त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत केले होते. त्यापाठोपाठ आता वनडे मालिकेनंतर टी-20 मध्येही वेस्ट इंडीजचा धुव्वा उडाला. भारतीय संघाने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना 17 धावांनी जिंकत ही मालिकाही 3-0 अशी खिशात घातली. (IND vs WI Rohit Sharma Lead Team India Whitewash West Indies Victory In Final T20)

हेही वाचा: भाई, एक और ले आओ! कोहलीला कडक रिप्लाय

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात वेस्ट इंडीजचा कर्णधार कायरेन पोलार्डनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने नवे प्रयोग केले. इशान किशन आणि ऋतूराज गायकवाड या जोडीनं डावाला सुरुवात केली. ऋतूराज अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ श्रेयस अय्यर 25(16), रोहित शर्मा 7 (15) स्वस्तात माघारी परतले. सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या जोडीनं पाचव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या निर्धारित 20 षटकात 184 धावांपर्यंत पोहचवली.

हेही वाचा: IND vs WI : ईडन गार्डन्सवर रात्री पडली 'सुर्याची किरणं'

या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात दीपक चहरने पाहुण्या संघाला दणका दिला. मेयर्स 6, शाई होप 8, रावमन पॉवेल 25, पोलार्ड 5, जेसन होल्डर 2, रोस्टन चेस 12 धावा करुन स्वस्तात माघारी फिरला. निकोलस पूरनने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली. मालिकेत त्याचे हे तिसरे अर्धशतक ठरले. त्याची एकाकी झुंज वेस्ट इंडीजला पराभवापासून वाचवू शकली नाही. वेस्ट इंडीज विरुद्धची मालिका संपण्यापूर्वीच रोहित शर्माकडे कसोटी संघाचे नेतृत्वही देण्यात आले होते. प्रमोशन होताच रोहितच्या नावे धमाल विक्रमाची नोंद झाली आहे.

Web Title: Ind Vs Wi Rohit Sharma Lead Team India Whitewash West Indies Victory In Final T20

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top