IND vs WI: रोहितसह बड्या खेळाडूंना विश्रांती, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा

India Squad for West Indies Tour
India Squad for West Indies Tour
Updated on

India Squad for West Indies Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 27 जून रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

India Squad for West Indies Tour
Chetan Sharma : स्टिंग ऑपरेशनमुळे राजीनामा देणारा चेतन शर्मा पुन्हा बनला सिलेक्टर, फ्लॉप खेळाडूला बनवले कर्णधार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे आणि टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू केवळ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत.

दुसरीकडे, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या कामाचा ताण लक्षात घेता कोणत्याही मालिकेत संघाचा भाग असणार नाहीत. संपूर्ण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी दोन्ही वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली जाऊ शकते.

India Squad for West Indies Tour
Asia Cup 2023 : आशिया कपचं गणित बिघडलं; पाकिस्तानात कोणते 4 सामने होणार? समीकरण जाणून घ्या

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यासारख्या अनेक खेळाडूंना एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 मालिकेचा भाग होण्याची अपेक्षा आहे. सॅमसन आणि उमरान यांना पांढऱ्या चेंडूच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर जैस्वाल आणि अर्शदीप कसोटी संघाचा भाग असण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन ?

इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, "हार्दिक पांड्या हा नक्कीच एक पर्याय आहे, परंतु कसोटीत परतल्यावर हार्दिकलाच निर्णय घ्यावा लागेल. निवडकर्त्यांना त्याला पांढऱ्या जर्सीत पाहायचे आहे. पण तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याच्या स्थितीत आहे का, विशेषत: तो एकदिवसीय क्रिकेटमधला महत्त्वाचा खेळाडू आहे, हे त्याने ठरवायचे आहे.

India Squad for West Indies Tour
WTC Final नंतर शुभमन अन् सारा व्हॅकेशनवर; दोघं फिरतायत तरी कुठं?

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

टेस्ट सीरीज

  1. पहिला सामना - 12 जुलै, बुधवार ते 16 जुलै, रविवार

  2. दुसरा सामना - 20 जुलै, गुरुवार ते 24 जुलै, सोमवार

एक दिवसीय मालिका

  1. पहिला सामना - 27 जुलै, गुरुवार

  2. दुसरा सामना - २९ जुलै, शुक्रवार

  3. तिसरा सामना - १५ ऑगस्ट, मंगळवार

टी-20 मालिका

  1. पहिला सामना - 4 ऑगस्ट, शुक्रवार

  2. दुसरा सामना - 6 ऑगस्ट, रविवार

  3. तिसरा सामना - 8 ऑगस्ट, मंगळवार

  4. चौथा सामना - 12 ऑगस्ट, शनिवार

  5. पाचवा सामना - 13 ऑगस्ट, रविवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com