
IND vs WI T20 WC: भारतीय संघात मोठा बदल! स्मृती मानधना परतली; ही आहे टीम इंडियाची प्लेइंग-11
India vs West indies Women’s T20 World Cup : पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर आज भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरला आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळल्या जाणार आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मृती मानधना भारतीय संघात परतली आहे.
पाकिस्तानविरुद्ध जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांच्या खेळीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पण पाकिस्तानने प्रथम खेळताना 149 धावा केल्या होत्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी शेवटच्या षटकात बरेच झेल सोडले. संघाला झेल सुधारावे लागतील. या चुकाही भारी असू शकतात.
भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या सात टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. गेल्या महिन्यातच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा दोनदा पराभव केला होता. त्याआधी 2019 मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला त्यांच्या घरी जाऊन 5 सामन्यांची मालिका क्लीन स्वीप केली होती.
भारताची प्लेइंग इलेव्हन : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (क), रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर.