Ind Vs Zim : BCCI चा मोठा निर्णय, कर्णधारपदानंतर कोचमध्ये ही बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs zim rahul dravid veteran vvs laxman became coach

Ind Vs Zim : BCCI चा मोठा निर्णय, कर्णधारपदानंतर कोचमध्ये ही बदल

India vs Zimbabwe : भारतीय संघाला झिम्बाब्वे विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्यांदा संघाचा कर्णधार बदलण्यात आला आणि आता प्रशिक्षकही बदलला आहे. टीम इंडियाचे या मालिकेसाठी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड सोबत नसले तरी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत असतील. आशिया कप डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून राहुल द्रविडवरील कामाचा ताण कमी करता येईल. लक्ष्मण प्रशिक्षक बनण्याची घोषणा खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे.

हेही वाचा: Ind vs Zim : झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू बाहेर!

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे प्रभारी असेल. झिम्बाब्वेमधील एकदिवसीय मालिका 22 ऑगस्ट रोजी संपेल आणि द्रविड भारतीय संघासह 23 ऑगस्ट रोजी यूएईला जाणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये फारच कमी फरक असल्याने लक्ष्मणकडे झिम्बाब्वेमध्ये भारतीय संघाची धुरा देण्यात आली आहे.

शिखर धवनला प्रथम झिम्बाब्वे दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु केएल राहुलला तंदुरुस्त घोषित करून संघात परतण्यात आले. अशा स्थितीत त्याला आता कर्णधार आणि शिखर धवनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

  • भारतीय संघ :

    केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर

Web Title: Ind Vs Zim Rahul Dravid Veteran Vvs Laxman Became Coach Of The Indian Team Zimbabwe Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..