india vs zimbabwe : झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू बाहेर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Zimbabwe Washington Sundar Injured

Ind vs Zim : झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू बाहेर!

India vs Zimbabwe Washington Sundar Injured : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा झिम्बाब्वे दौरा संशयाच्या भोवऱ्यात आहे, जिथे टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला अलीकडेच इंग्लंडमधील मँचेस्टर येथे लिस्ट ए सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शनिवारी सकाळी झिम्बाब्वेला रवाना होईल आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण असेल. क्रिकबझच्या अहवालात म्हटले आहे की, सुंदर त्याच्या फिटनेसमुळे संशयाच्या भोवऱ्यात आहे.

हेही वाचा: कोणाला वगळणार : सूर्य, पंत की कार्तिक?

लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबने सुंदरच्या दुखापतीबद्दल ट्विट केले असून, क्षेत्ररक्षण करताना पडल्यामुळे डाव्या खांद्याच्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मैदान सोडले. भारत 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेमध्ये ICC सुपर लीगचा भाग म्हणून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. झिम्बाब्वे अलीकडेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी 10 ऑगस्ट रोजी संपलेल्या वनडे आणि T20 आंतरराष्ट्रीय दोन्ही मालिकेत बांगलादेशचा पराभव केला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर

Web Title: Ind Vs Zim Washington Sundar Injured Doubtful For Zimbabwe Tour Indian Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..