Asian Championship 2025: तिरंदाजांचा ‘दस का दम’; आशियाई स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकांसह अव्वल
India Tops Medal Table in Asian Archery: ढाकामध्ये झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ ब्राँझ अशा १० पदकांसह सर्वाधिक स्थान मिळवले.
ढाका : भारतीय तिरंदाजांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण १० पदके पटकावली.