

India Hockey Team
Sakal
Hockey World Cup 2026, India vs Pakistan: हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सध्या सुरू असून बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान पुरुषांचा सामना बुधवारी (१९ ऑगस्ट) झाला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानविरुद्ध ५-३ अशा गोल फरकाने विजय मिळवला आणि पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
मात्र पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपले. हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो सामना होता. पण अखेर भारताने बाजी मारली. डी गटातील हा सामना होता. त्यामुळे आता भारत आणि इंग्लंड या संघांनी या गटातून पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तान आणि वेल्स यांचे आव्हान संपले.
२०१० नंतर म्हणजेच १६ वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होते. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या या सामन्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अपेक्षेनुसार हा सामना रोमांचक झाला.