Archery World Cup: चीनलाच चीनमध्ये हरवत भारताचा सुवर्णवेध! दीपिका कुमारीच्या संघाची विश्वचषकात कमाल

India Wins Gold in Women’s Recurve Event: शांघाय येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने चीनचा थरारक शूट-ऑफमध्ये पराभव करत सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोड यांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने तीन वर्षांनंतर महिला रिकर्व्ह प्रकारात गोल्ड पटकावले.
Archery World Cup

Archery World Cup

esakal

Updated on

Archery World Cup: रविवारी शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोड या त्रिकुटाने यजमान चीनचा थरारक शूट-ऑफमध्ये पराभव करत ५-४ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत सामना ४-४ असा बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये भारताने २८-२६ अशी बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com