India's 4x400m mixed relay team wins gold medal दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुलवीर सिंगने पुरुषांच्या १०,००० मीटर स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर आज ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना चीनला चीतपट केले.