मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम 

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

दक्षिण आफ्रिकेविरुदध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ आज निवडण्यात आले. मिताली राज एकदिवसीय तर हरमनप्रीत कौर ट्‌वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी कायम आहेत. 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुदध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकांसाठी भारतीय संघ आज निवडण्यात आले. मिताली राज एकदिवसीय तर हरमनप्रीत कौर ट्‌वेन्टी-20 संघांच्या कर्णधारपदी कायम आहेत. 

मितालीने दोन दिवसांपूर्वीच ट्‌वेन्टी-20 सामन्यातून निवृत्ती स्वीकारली होती. उर्वरित संघात फार बदल नसले तरी शेफाली वर्मा नवा चेहरा असेल. राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 सामन्यात हरियानाकडून खेळणाऱ्या शेफाली वर्माने 56 चेंडूत 120 धावांची खेळी केली होती. 

एकदिवसीय संघात पूनम राऊतने पुनरागमन केले आहे तर आक्रमक शैलीची फलंदाज वेदा कृष्णमूर्तीला या संघात स्थान देण्यात आले नाही. मितालीप्रमाणे आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी भारताची विक्रमवीर गोलंदाज जुलन गोस्वामी एकदिवसीय संघात कायम आहे. 

संघ : एकदिवसीय संघ : मिताली राज (कर्णधार), जेमिमा रॉडिग्ज, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पूनम राऊत, स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), जुलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिश्‍त, पूनम यादव, डी. हेमलता, राजेश्‍वरी गायकवाड आणि प्रिया पुनिया 

ट्‌वेंटी20 संघ : हमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल, अनुजा पाटील, शेफाली वर्मा आणि मानसी जोशी. 

अशा होतील मालिका- पाच टेन्टी-20 : 24, 26, 29 सप्टेंबर 1 आणि 4 ऑक्‍टोबर (सर्व सामने सूरत) 
तीन एकदिवसीय : 9, 11, 14 ऑक्‍टोबर (सर्व सामने बडोदा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India declares womens team squad against South Africa