India vs South Africa : भारताने मालिका जिंकत ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

India defeat South Africa In 3rd ODI Equals Australia 2003 Most International Matches Wins World Record
India defeat South Africa In 3rd ODI Equals Australia 2003 Most International Matches Wins World Record esakal

India vs South Africa : भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 फलंदाज राखून पराभव करत मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताने दक्षिण आफ्रिकेचे 100 धावांचे माफक आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.1 षटकात पार केले. भारताकडून शुभमन गिलने 49 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा करत भारताचा विजय षटकार मारून साकार केला. कुलदीप यादवने 4 षटकात 4 विकेट घेतल्या. भारताने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाचा एका कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. (India defeat South Africa In 3rd ODI Equals Australia 2003 Most International Matches Wins World Record)

India defeat South Africa In 3rd ODI Equals Australia 2003 Most International Matches Wins World Record
IND vs SA ODI : विजयाचं 'शिखर' सर; टीम इंडियाच्या दुय्यम संघाने बलाढ्य आफ्रिकेला पाजले पाणी

भारताने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 फलंदाज राखून विजय मिळवला होता. त्यावेळीच भारताने भारताचेच 2017 मधील एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 37 सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज तिसऱ्या वनडे सामन्यात देखील भारताने आफ्रिकेचा 7 फलंदाज राखूनच पराभव करत मालिका खिशात टाकली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे 2003 मधील एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली.

India defeat South Africa In 3rd ODI Equals Australia 2003 Most International Matches Wins World Record
Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीवर पाकिस्तानने दिली मोठी अपडेट

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि निर्णयाक सामन्यात 99 धावात गुंडाळत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीचा चांगला फायदा उचलला. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर शाहबाज अहदम, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. आफ्रिकेकडून क्लासेननने सर्वाधिक 34 धावा केल्या.

आजच्या सामन्याचा सामनावीर म्हणून 4 षटकात 4 विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवची निवड करण्यात आली. तर संपूर्ण मालिकेत भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या फलंदाजीला भगदाड पाडणाऱ्या मोहम्मद सिराजला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com