
राजगीर (बिहार) : एफआयएच प्रो-लीगच्या या वर्षी पार पडलेल्या मोसमात सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई करंडकातील ‘अ’ गटातील पहिल्याच लढतीत विजय मिळवला खरा... पण जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हॉकी संघाने यजमान संघाला चांगलेच झुंजवले. कर्णधार हरमनप्रीत सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर केलेले तीन गोल भारतीय संघाच्या ४-३ने मिळवलेल्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले, मात्र चीनच्या हॉकीपटूंनी या लढतीत दिलेली झुंज काबिल-ए-तारीफ ठरली.