आशियाई युवा व्हॉलीबॉलमध्ये भारत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

भारतीय युवा (23 वर्षांखालील) व्हॉलीबॉल संघाने ऐतिहासिक वाटचाल करताना प्रथमच आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चीन आणि न्यूझीलंडला पराजित करीत भारताने गटात अव्वल क्रमांक मिळवला.

मुंबई : भारतीय युवा (23 वर्षांखालील) व्हॉलीबॉल संघाने ऐतिहासिक वाटचाल करताना प्रथमच आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चीन आणि न्यूझीलंडला पराजित करीत भारताने गटात अव्वल क्रमांक मिळवला.

भारतीय संघास थायलंडविरुद्ध 2-3 अशी हार पत्करावी लागली होती, तरीही भारताने म्यानमारला सुरू असलेल्या स्पर्धेत आगेकूच केली. भारतीय संघाला थायलंडविरुद्ध 25-15, 23-25, 22-25, 25-19, 13-15 अशी हार पत्करावी लागली. भारत थायलंडविरुद्ध पराजित झाल्याने भारत, चीन आणि थायलंडचे समान गुण झाले. भारताने या लढतीत दोन सेट जिंकल्याने त्यांची सरासरी उंचावली.

आम्ही चीन तसेच न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगला खेळ केला होता. चीन वेगवान खेळ करतात, पण आम्ही त्यांना खेळाचा वेग कमी करण्यास भाग पाडले आणि त्या जोरावर बाजी मारली. न्यूझीलंडचा संघ युरोपियन पद्धतीने खेळतो. त्यांच्याविरुद्धही आम्ही सरस ठरलो, असे भारताचे मार्गदर्शक प्रीतम सिंग यांनी सांगितले.

थायंलडची आणि आपली खेळाची शैली सारखीच आहे. आपण बचावात काहीसे कमी पडलो. अर्थात या लढतीतून खूप काही शिकलो आहोत. त्याचा फायदा नक्कीच होईल.
आता भारताची कझाकस्तान आणि जपानविरुद्ध लढत होईल. त्या लढतीनंतर भारतास कोणते मानांकन हे ठरेल आणि त्यानुसार बाद फेरीच्या लढती निश्‍चित होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india enters qurter final in asian under 23 volleyball

टॅग्स