लंडन : तीन गोल स्वीकारल्यानंतरही जिगरबाज खेळ करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला..पहिल्या ३५ मिनिटांच्या खेळात ऑस्ट्रेलियाने भारतावर तीन गोल केले होते. कोर्टनी स्कोनेल (१६वे मिनिट), लेक्सी पिकरिंग (२६) यांनी मैदानी गोल केल्यानंतर तातूम स्टीवर्टने ३५व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला होता. .हे तीन गोल स्वीकारल्यानंतर भारतीयांनी उलटवार केला. दीपिका आणि नेहा यांनी पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. सामन्याच्या सुरुवातीला भारतीयांकडून चांगले पासेस केले जात होता. ऑस्ट्रेलियाच्या बचावावर दडपण आणले गेले होते..नवव्याच मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळाला होता; परंतु त्यावर गोल करता आला नाही. १३व्या मिनिटालाही भारताचा एक चांगला प्रयत्न अपुरा ठरला..Ranji Trophy 2025 : रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून; दुलीप करंडक स्पर्धा २८ ऑगस्टपासून.ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक अलिशा पॉवेर हिने उत्तम गोलरक्षण केले आणि त्यानंतर सामन्याचे पारडे बदलले. पुढच्याच मिनिटाला भारताचा बचाव भेदला गेला आणि कोर्टनी स्कोनेल हिने पहिला गोल केला. सहा मिनिटांनंतर ऑस्ट्रेलियाने आपली आघाडी वाढवली. त्यानंतर मिळालेला पेनल्टी स्ट्रोक त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.