
कृतीपेक्षा बोलणे सोपे असते, असे असले तरी पुढील आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये आम्ही एकही गोल न स्वीकारता मालदीव आणि बांगलादेश यांना हरवण्याचे लक्ष्य बाळगले आहे, असा निर्धार अनुभवी बचाव खेळाडू संदेश झिंगन याने व्यक्त केला आहे.
भारतीय फुटबॉलचा सुपरस्टार सुनील छेत्रीने निवृत्ती मागे टाकून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. १९ मार्च रोजी भारताचा मायदेशात मालदीवविरुद्ध सामना होत आहे. त्यानंतर एएफसी आशिया करंडक पात्रता स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. हा सामना २५ मार्च रोजी होणार आहे.