गोलंदाजांची कामगिरी चोख, फलंदाजीत सुधारणा हवी : द्रविड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

गोलंदाजांची कामगिरी चोख, फलंदाजीत सुधारणा हवी : द्रविड

त्याची शांतता ही वादळा अगोदरची अशा शब्दांत द्रविडकडून विराटची पाठराखण

पहिला कसोटी सामना जिंकताना आपल्या गोलंदाजांनी फारच चोख कामगिरी पार पाडली. पहिल्या दिवशीच्या 3 बाद 272 धावसंख्येवरून आपल्या फलंदाजांना अजून मोठी धावसंख्या उभारता यायला हवी होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणून फलंदाजीत सुधारणा करायला हवी. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे सारख्या दर्जेदार फलंदाजांनी मोठी खेळी करावी अशीच अपेक्षा असते. एक लक्षात घेतले पाहिजे की, इथे फलंदाज कधीही पूर्ण स्थिरावत नाही. कारण खेळपट्टी गोलंदाजांना सतत काहीतरी मदत करत असते, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसर्‍या कसोटी सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. (india in south africa rahul dravid press conferences before Johannesburg 2nd Test)

विराट कोहली-अजिंक्य रहाणेची गडबड काय होतेय असा प्रश्न विचारता द्रविड म्हणाले की, प्रदीर्घकाळ खेळल्यावर असा काळ येतो की, चांगली फलंदाजी होत असते पण मोठी खेळी होत नाही. हे सगळे चांगले फलंदाज असून ते नेहमी खूप मोठे ध्येय ठेवतात. हे फलंदाज मोठी खेळी करण्यासाठी सर्वात उत्सुक आहेत. मला आशा आहे तशी मोठी खेळी अगदी कोपर्‍यावर त्याची वाट बघते आहे. विराट कोहलीच्या कार्यपद्धतीची स्तुती करताना राहुल द्रविड म्हणाले, विराटची नेतृत्वशैली कमालीची आहे. तो खूप मेहनत घेत असून यात तो अजितबात कमी पडत नाही. आणि प्रक्रियेवर पूर्ण लक्ष देतो. त्यामुळे दौर्‍याअगोदरच्या सुरु असलेल्या चर्चेचा त्याच्यावर कणभरही परिणाम झालेला नाही. त्याची शांतता ही वादळा अगोदरची शांतता वाटते आहे, अशा शब्दांत द्रविड यांनी कोहलीचे कौतुक केले.

हेही वाचा: इंग्लंडचा सपोर्ट स्टाफ गायब; सवंगडीच झाले एकमेकांचे कोच

दंडात्मक कारवाईसंदर्भात सावध पवित्रा

पहिल्या कसोटीत षटकांची गती न राखल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतक्त्यात एका गुणाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. या बद्दल बोलताना द्रविड जरा सांभाळून बोलले. ते म्हणाले, नियम चूक बरोबर पेक्षा सगळ्यांकरता सारखे आहेत. षटकांची गती न राखल्याने 1 गुण गेला. मागील सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण तालिकेतील गुण कमी झाल्यानंतर आम्ही यावर चर्चा केली आहे. काय करायला लागेल हे ठरवले आहे. नियमाची अंमलबजावणी करताना दुखापती आणि गरम हवेमुळे थोडी गडबड होते याचा विचार थोडा झाला तर बरे वाटेल.

हेही वाचा: हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा; नव्या हिरोचा 'सुपर प्लॅन'

दुसऱ्या सामन्यासंदर्भात काय म्हणाले द्रविड

दुसर्‍या कसोटीच्या बाबत बोलताना द्रविड म्हणाले, हवामान चांगले आहे जोहान्सबर्गचे. विकेटही चांगले वाटत आहे. वाँडरर्सच्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही संधी असते. हे विकेट असे आहे जिथे निकाल लागतो. आपले इथे रेकॉर्ड चांगले आहे इथले. माझे कसोटी क्रिकेटमधले पहिले शतक याच मैदानावर झाले आहे जे मी कधीच विसरू शकत नाही. इथली खेळपट्टी वेगवान आहे पण उसळी त्रासदायक नाहीये. मला वाटते गोलंदाज उत्तमच मारा आहेत. त्यांना वेगळे काही सांगण्याची गरज नाही पडत आहे. पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी पहिल्या आणि दुसर्‍या डावात वेगळ्या टप्प्यावर मारा केला याला कौशल्य लागते. वाँन्डरर्सला कसोटी सामना खेळताना फलंदाजांना शॉट सिलेक्शन म्हणजे फटके मारताना निवडायच्या चेंडूच्या अंदाजात सुधारणा करावी लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणीच भारतीय संघातील खेळाडू 1-0 आघाडीवर समाधान मानायचे नाही हे एकमेकांनाच बजावत आहेत. प्रशिक्षक म्हणून त्यामुळे माझे काम सोपे होते आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top