IND vs AUS : रोहितने मैदानातच का धरला कार्तिकचा गळा; सूर्यकुमार यादवने केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav On Viral Video

IND vs AUS : रोहितने मैदानातच का धरला कार्तिकचा गळा; सूर्यकुमार यादवने केला खुलासा

Suryakumar Yadav On Viral Video : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली टी20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाला 208 धावांचे लक्ष्य राखता आले नाही. ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात 209 धावा करत सामना जिंकला.

या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा गळा धरला होता. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात नेमके काय झाले होते, यावर सूर्यकुमार यादवने वक्तव्य केले आहे.

हेही वाचा: Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास

सूर्यकुमार यादव म्हणाले की, मोहाली टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात फक्त विनोद झाला होता. दोन्ही खेळाडू खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. त्यामुळे हे खूप सामान्य आहे. पहिल्या T20 सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा विनोद करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही मस्करी करताना रोहित दिनेश कार्तिकचा गळा धरतांना दिसत आहेत.

पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकने ग्लेन मॅक्सवेलचा झेल पकडला, परंतु त्याने बाद करण्याचे अपील केले नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मजेदार पद्धतीने दिनेश कार्तिकची गळा पकडली होता. या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव म्हणाले की, जेव्हा डीआरएसचा विचार केला जातो तेव्हा काही वेळा आवाज फार मागे जात नाही. या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. संघाने तीन झेल सोडले. या पराभवात क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीही खराब होती. अक्षर पटेल वगळता सर्वांनी भरपूर धावा दिल्या.

हेही वाचा: IND vs AUS : नागपुरात चर्चा लढतीची नव्हे, केवळ पावसाची

अष्टपैलू हार्दिक पांड्या (नाबाद 71) आणि सलामीवीर केएल राहुल (55 धावा) यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव (46 धावा) करत भारताने 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली. मात्र ऑस्ट्रेलियाने ग्रीनचे अर्धशतक, स्टीव्ह स्मिथच्या 35 आणि वेडच्या 21 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 45 धावांच्या जोरावर 19.2 षटकांत सहा बाद 211 धावा करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाच्या सामन्यात टीम डेव्हिडने 18 धावा केल्या.

Web Title: Suryakumar Yadav On Rohit Sharma Dinesh Karthik Viral Video Mohali T20 Match Against Australia Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..