IND vs ENG : कुचकामी फिरकी अन् छोट्या सामन्यातील मोठे स्टार; भारताच्या पराभवाची ही आहेत 5 कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reasons Of India Lost In Semi Final

IND vs ENG : कुचकामी फिरकी अन् छोट्या सामन्यातील मोठे स्टार; भारताच्या पराभवाची ही आहेत 5 कारणे

Reasons Of India Lost In Semi Final : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा तब्बल 10 विकेट्सनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता 13 नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून क्रिकेट जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे. दरम्यान, भारताने सेमी फायनल सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये थोडा देखील झुंजारपणा दाखवला नाही. त्यामुळे भारताला इंग्लंडची साधी एक विकेट देखील घेता आली नाही. टीम इंडियाचे आजच्या सामन्यात कुठे चुकले याचे विश्लेषण करताना प्रामुख्याने पाच कराणे पुढे येतात.

हेही वाचा: Rohit Sharma : 'IPL मध्ये हेच खेळाडू दबावात चांगले खेळतात मात्र...' पाणावले रोहितचे डोळे

पॉवर प्लेमध्ये खराब सुरूवात

भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पॉवर प्लेची खराब सुरूवात केली. इंग्लंडसारख्या तगडी बॅटिंग असलेल्या संघाविरूद्ध मोठी धावसंख्या उभारण्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेमध्ये दमदार सुरूवात ही गरजेचीच असते. मात्र भारताने दुसऱ्याच षटकात केएल राहुलला गमावले. त्यानंतर भारताला पहिल्या 6 षटकात फक्त 38 धावाच करता आल्या. त्यानंतरही भारताने पुढच्या 10 षटकापर्यंत 62 धावाच केल्या.

दुसरीकडे भारताने गोलंदाजीत देखील पॉवर प्लेमध्ये टिच्चून मारा केला नाही. जरी भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे टार्गेट ठेवले असले तरी ही फायटिंग टोटल होती. या मैदानावर इंग्लंडने 154 धावाच चेस केल्या होत्या. मात्र पॉवर प्लेमध्ये भारताला चांगली गोलंदाजी करता आली नाही. भारताने पॉवर प्लेमध्ये आपले प्रमुख अस्त्र मोहम्मद शमीचा वापरच केला नाही. याचा फटका आपल्याला बसला आणि इंग्लंडने फायरी स्टार्ट दिला.

मोठ्या सामन्यात स्टार कुचकामी

भारतीय संघातील अनेक खेळाडूंकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. मात्र यातील अनेक खेळाडू हे फक्त कमकवूत संघाविरूद्धच कामगिरी करताना दिसतात. केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही. मात्र हे खेळाडू नेमके सेमी फायनल किंवा तगड्या संघाविरूद्ध कच खातात. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये देखील विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने झुंजार खेळी केली. मात्र रोहितसह केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले.

हेही वाचा: END vs IND : 'बॅगा भरा घरी या...' चाहते खेळाडूंवर भडकले, सोशल मीडियावर Memes चा पाऊस

फिरकीपटूंची फ्लॉप शो

जरी यंदाचा वर्ल्डकप हा ऑस्ट्रेलियात होत असला तरी ऑस्ट्रेलियात टी 20 साठी कसोटीसारध्या फायरी विकेट दिल्या जात नाही. हा वेगवान गोलंदाजांना फायदा मिळतो. मात्र फिरकीपटू देखील तितकीच मोठी भुमिका बजावतात. म्हणूनच यंदाच्या टी 20 वर्ल्डकपचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (वानिंदू हसरंगा) हा लेग स्पिनर आहे.

टी 20 सामन्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्हाला 5 ते 15 या षटकात चांगली कामगिरी करावी लागते. इथेच भारतीय फिरकीपटू कमी पडले. आजच्या सामन्यात देखील अश्विन आणि अक्षर पटेलला जोडी फोडण्यात अपयश आले. दुसरीकडे इंग्लंडच्या दोन्ही लेग स्पिनर्सनी भारताला चांगलेच बांधून ठेवले होते.

बॉडी लँग्वेज

शेवटी सामना जिंकण्यासाठी तुमच्याकडे गुणवत्ता असून उपयोग नाही. तुमच्याकडे मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची आणि खडतर परिस्थितीतही झुंजार खेळ करून पुनरागमन करण्याची उर्मी लागते. हीच उर्मी आजच्या सामन्यात मिसिंग होती. तसेही सामन्यापूर्वीच रोहित शर्मा म्हणाला होता की एका सामन्यावर तुमचे मुल्यमापन होऊ नये. हा एक निगेटिव्ह अॅप्रोच आहे. हाच अॅप्रोच आपण गोलंदाजी करताना दिसला.

बटलरने पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारल्यानंतर टीम इंडियाची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह मोडमध्ये गेली. दरम्यान, हार्दिक पांड्याने संघासह प्रेक्षकांचे देखील मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र बटलर - हेल्स यांच्या धडाक्यापुढे कर्णधारासह संघाचे मनोबल काही वाढवले नाही.

बुमराह जडेजाची कमतरता जाणवलीच

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुपर 12 मधील सामन्यात कोणी नो कोणी आपला खेळ उंचावत भारताला विजय मिळवून दिले होते. त्यामुळे आपल्याला जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांची फारशी कमतरता जाणवली नव्हती. मात्र हे दोघेजण संघात असणे किती महत्वाचे आहे हे इंग्लंडने सेमी फायनलमध्ये दाखवून दिले. भारताला सलामी जोडी फोडता आली नाही. तसचे ओढून ताणून संघात समतोल आणण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न आज इंग्लंडविरूद्ध फसला.