INDvsNZ : परदेशात गेले अन् लायकी कळाली; कसोटीतही व्हाइट वॉश

वृत्तसंस्था
Monday, 2 March 2020

भारतीय संघ 124 धावांवर बाद झाला आणि त्यांनी किवींना जिंकण्यासाठी 132 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान किवींनी फक्त तीन फलंदाज गमावून पार केले आणि दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवला.

ख्राईस्टचर्च : भारतीय क्रिकेट संघाला तो फक्त गल्लीतला शेर आहे असे टोमणे अनेकवेळा ऐकावे लागले आहेत. मात्र, गेल्या काही परदेशी दौऱ्यामध्ये भारतीय संघाने हा ठप्पा पुसून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने सपाटून मार खात एकदिवसीय पाठोपाठ कसोटी मालिकेतही व्हाइटवॉशचा सामना करावा लागला आहे. 

INDvsNZ: 'या' फास्ट बॉलरचा विराट कोहली ठरलाय 'बकरा'!

दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तिसऱ्याच दिवशी सात विकेट्सने पराभव केला आणि मालिका 2-0 अशी खिशात घातली. सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याअगोदर अजिंक्य रहाणे आणि खंबीर फलंदाजी करणार्‍या चेतेश्वर पुजाराला बाद करण्यात किवी गोलंदाजांना यश आले तिथेच सामना जिंकण्याच्या स्वप्नाला धक्का लागला. तिसऱ्या दिवसाला सुरवात झाल्यावर हनुमा विहारी आणि रिषभ पंत खेळत होते मात्र, त्यांनाही काहीच छाप पाडता आली नाही आणि ते लगेच बाद झाले. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. अखेरच्या टप्प्यात केवळ रवींद्र जडेजाने दुहेरी (16) धावा केल्या. 

- 'ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र

भारतीय संघ 124 धावांवर बाद झाला आणि त्यांनी किवींना जिंकण्यासाठी 132 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान किवींनी फक्त तीन फलंदाज गमावून पार केले आणि दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवला. वेगवान गोलंदाज टीम साउदीला 14 विकेट घेतल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या मालिका विजयासह किवींनी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 60 धावांची कमाई केली तर आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India lost test series by 2-0 against new zealand